Home political जनतेला मोदी यांचे नेतृत्व हवे आहे – राम कुलकर्णी

जनतेला मोदी यांचे नेतृत्व हवे आहे – राम कुलकर्णी

0

 

मुंबई -पाच राज्याचा निवडणुक निकाल अपेक्षित लागत आहे. राजस्थान, मध्य प्रदेशात भाजपला यश मिळत आहे. तेलंगणातही आमची कामगिरी जोरदार आहे. छत्तीसगड मध्ये काँग्रेसला घाम फुटला असून खा. संजय राऊत आणि काँग्रेस प्रवक्ते कुठल्या बिळात लपले आहेत? असा सवाल राम कुलकर्णी, भाजपा प्रवक्ते यांनी व्यक्त केला आहे.
अतुल लोढें निकालापूर्वी बडबड करत होते. दुसऱ्यांच्या वरातीत घोडं नाचवायची सवय या मंडळींना आहे.
बहुमत भारतीय जनता पक्षाला मिळत आहेत. याचाच अर्थ देशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व देशात हवे आहे.म्हणून हा निकाल आज आमच्या बाजूने लागत आहे. समाधानकारक निकाल लागत आहे. दूध का दूध आणि पाणी का पाणी हे सिद्ध झाले आहे यावर कुलकर्णी यांनी भर दिला.