कर्मचारी संपाच्या मुद्द्यावर याचिका, उच्च न्यायालय हस्तक्षेप करणार?

0

मुंबईः जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य कर्मचाऱ्यांच्या संपाचा मुद्दा आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला असून यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. संप करणाऱ्यांच्या मागण्या योग्य असू शकतात मात्र हा संप बेदायदेशीर असल्याचा दावा या याचिकेत करण्यात (Petition on State government employees strike) आला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका दाखल केली असून त्यावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती केली आहे. जुन्या पेन्शनसाठी गेल्या दोन दिवसांपासून संप सुरु आहे. आज संपाचा तिसरा दिवस असून अनेक जिल्ह्यांत संपाचे दुष्परिणाम दिसायला लागले आहेत. विद्यार्थी आणि रुग्णांचे अतोनात हाल होत असल्याचा दाखला देत हा संप बेदायदेशीर असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे आता या याचिकेवर न्यायालय काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर कालपासून मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाईला सुुरुवात झाली आहे. राज्य सरकारने या मुद्यावर अभ्यास समिती गठित करण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी तो निर्णय समन्वय समितीला मान्य नाही. तर दुसरीकडे संपातही फूट पडल्याचे दिसून आले. महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपरिषद कामगार कर्मचारी संघटनेने संपातून माघार घेतली तर प्राथमिक शिक्षकांच्या संघटनेने देखील माघार घेतली आहे.

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा