नागपूर. परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील व्हॉट्सअप वापरणाऱ्या व्यक्तीने शासकीय कार्यालयाती कार्यरत दोन महिलांचे फोटो मॉर्फिंग करून व्हॉट्सअप ग्रुपवर पाठविले. या विषयावरील लक्षवेधी दरम्यान माजी मंत्री जयंत पाटील यांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांचा फोटोही मॉर्फ करण्यात आल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी हा प्रकरा केल्याचे ते म्हणाले. सभागृहातील सदस्यच दुसऱ्या सन्माननीय आणि ज्येष्ठ सदस्यांचा फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर प्रसारित करून ट्रोल करत असेल तर ते योग्य नाही. गृहमंत्री त्यांच्यावर काय कारवाई करणार असा सवालही जयंत पाटील यांनी केला.
छगन भुजबळ यांचे मोबाईलमधील ते छायाचित्र दाखवत हे अतिशय गंभीर आहे असेही जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान राजकीय नेत्यांनी अशा गोष्टी करु नये त्यांनी सोशल मिडियावर संहिता पाळाव्यात असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. जिंतूर येथील प्रकरणात फारच गभीर आहे. फोटो मार्फिंग करणारा व्यक्ती सामान्य नाही. तो तंत्रज्ञान हाताळणीत तरबेज आहे. यासारख्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी कायद्याची गरज आहे काय, याची चाचपणी करण्यांसंदर्भात प्रमुख नेत्यांची समिती नियुक्त करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.