गांजा शेतीवर पोलिस धडकले शेतकऱ्याला ठोकल्या बेड्या

0

 

बीड BEED –  बीडच्या गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे गेवराई पोलिसांनी एका गांजा शेतीवर मोठी कारवाई केली. धोंडराई येथील शेतात लाखो रुपयांच्या गांजांची झाडे जप्त करण्यात आली आहेत. तालुक्यातील धोंडराई शिवारातील सर्वे नंबर ४५२ मध्ये गणपत लक्ष्मण साखरे यांच्या शेतात कपाशी पिकामध्ये असलेल्या लाखो रुपये किंमतीची गांजांची झाडे जप्त केली. कपाशीच्या शेतातील झाडे उपटण्याठी पोलिसांसह मजुरांचा ताफा लावण्यात आला होता. धोंडराई शिवारातील शेतात गांजा असल्याची माहिती गेवराई पोलीसांना मिळाल्यानंतर गेवराई पोलीसांनी शेतात छापा मारत गांजाची एकुण ४६ झाडे ताब्यात घेत ही धडक कारवाई केली आहे. शेतकरी साखरे यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.