प्रशांत किशोरांचं मोठं भाकीत; म्हणाले, यांचे सरकार येईल!

0

दिवसभरातील बातम्या ।

4 जूनला लोकसभेचा काय निकाल लागणार?
प्रशांत किशोरांचं मोठं भाकीत

लोकसभा निवडणुकीतचे पाच टप्पे पुर्ण झाले आहे. आणखी दोन टप्पे शिल्लक आहेत. निवडणुकीचा निकाल 4 जूला लागेल. त्या आधी कोण बाजी मारणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. तर काही राजकीय विश्लेषक आपले अंदाजही व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांची एका वाहिनीने खास मुलाखत घेतली. या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीचा निकाला काय असेल यावर भाष्य केले आहे. शिवाय विरोधी पक्षाबाबतही आपली मतं मांडली आहे. केंद्रात कोणाचे सरकार येईल याचेही भाकीत केले आहे. त्यांनी केंद्रात सरकार हे भाजप प्रणित एनडीएचे येईल हे निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले. 2019 साली जेवढ्या जागा भाजप आणि एनडीएने जिंकल्या आहेत तेवढ्याच जागा कायम राहातील. एखाद्या वेळेस त्यापेक्षा थोड्या जास्त जागाही जिंकतील असेही ते म्हणाले. त्यामुळे भाजपचे केंद्रात सरकार बनवणे निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.

13 मतदारसंघांमध्ये 54.33 शतांश टक्के मतदान
दिंडोरी मतदार संघात सर्वाधिक मतदान
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात काल राज्यातल्या 13 मतदारसंघांमध्ये मतदान झालं, एकंदर 54.33 शतांश टक्के मतदान झाल्याचं निवडणूक कार्यालयाने कळवला आहे. यापैकी सर्वाधिक 62.66 शतांश टक्के मतदान दिंडोरी मतदार संघात, तर त्या खालोखाल 61.65 शतांश टक्के मतदान पालघर मतदार संघात झालं. तर दक्षिण मुंबई मतदार संघात सर्वात कमी 47.7 शतांश टक्के मतदानाची नोंद झाली. धुळ्यात 56.61 शतांश टक्के नाशिक मध्ये 57.10% भिवंडी 56.41 शतांश टक्के कल्याण मध्ये 47.87% तर ठाणे मतदारसंघात 49.81 शतांश टक्के मतदान झालं. उत्तर मुंबई 55 पूर्णांक 21 शतांश टक्के उत्तर मध्य मुंबईमध्ये 51.42% उत्तर पूर्व मुंबई मतदार संघात 53.75 शतांश टक्के उत्तर पश्चिम मुंबई 53.67% तर दक्षिण मध्य मुंबईत 51.88% मतदानाची नोंद झाली याबरोबरच लोकसभा निवडणुकीची राज्यातली प्रक्रिया पूर्ण झाली आतापर्यंतच्या पाच टप्प्यांमध्ये देशभरातल्या एकंदर 428 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

उद्धव ठाकरे यांनी केली मतदारांची दिशाभूल
आशिष शेलार यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदान प्रक्रिया सुरू असताना पत्रकार परिषद घेऊन मतदारांची दिशाभूल केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. यासाठी ठाकरे यांच्यावर कारवाई करावी अशी तक्रार मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
मोदी सरकार पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर करत आहे, आयोगाचे प्रतिनिधी मतदान प्रक्रियेत दिरंगाई करत आहेत असा आरोप ठाकरे यांनी काल केला होता. हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे असं भाजपने म्हटले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदान करणाऱ्या देशवासियांचे समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये आभार मानले आहेत. गेल्या 35 वर्षात सर्वाधिक मतदानाची नोंद झाल्याबद्दल जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या नागरिकांची ही त्यांनी प्रशंसा केली आहे.

————-
पहिल्या 5 मिनिटांतच वेबसाईट क्रॅश
बारावीचा ऑनलाईन निकाल बघायला गर्दी

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल (12th Result 2024) जाहीर झाला असून दुपारी 1 वाजल्यापासून संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल बघण्यासाठी गर्दी झाली. विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळावर गेल्यानंतर त्यांना रिझल्ट पाहताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दुपारी 1 वाजता पालक आणि विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी संकेस्थळावर गेले, पण निकाल जाहीर होताच अवघ्या पाचच मिनिटांत महाराष्ट्र बोर्डाची वेबसाईट क्रॅश झाली आहे.
————-
महाभरती अंतर्गत उमेदवारांना परतावा
परीक्षा शुल्काची रक्कम परत होणार
जिल्हा परिषद चंद्रपूरच्या आस्थापनेवरील गट- क मधील 18 संवर्गातील रिक्त पदे भरण्यास माहे मार्च 2019 मध्ये तसेच ऑगस्ट 2021 मधील जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागाची पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने प्रसिध्द केलेली जाहिरात व संपुर्ण भरती प्रक्रिया शासन निणयान्वये रद्द करण्यात आली असून जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांचे शुल्क परत करण्याबाबत शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे. या परिक्षेकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे परिक्षा शुल्क परत करण्याच्या अनुषंगाने उमेदवारांसाठी दि. 5 सप्टेंबर 2023 पासून वेबसाईटवर लिंक सुरु करण्यात आली. जिल्हा परिषद चंद्रपूर येथे एकुण 21391 उमेदवारांनी अर्ज केले असून, आज तारखेपर्यंत फक्त 3857 उमेदवारांनीच परीक्षा शुल्क परत मिळणेकरीता संकेतस्थळावर माहिती भरलेली आहे. तेव्हा संबधित जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी परिक्षा शुल्क परत मिळविण्याकरिता सदर संकेतस्थळावर अचूक माहिती भरावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

१३ अनधिकृत जाहिरात फलक पाडले
चंद्रपुरात मनपाची कारवाई

चंद्रपूर महापालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात फलक निष्कासनाची कारवाई सुरू करण्यात आली असून, तीनही झोन मिळुन एकूण १३ जाहीरात फलकांवर निष्कासनाची कारवाई आली. तसेच पुढील दिवसांत शहरातील उर्वरित अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्तांनी मुंबई दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बैठक घेत शहरातील धोकादायक जाहिरात फलकांची तपासणी करून तातडीने कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार शहरातील जाहिरात फलकांचे सर्वेक्षण सुरू असुन या सर्वेक्षणामध्ये १२४ अधिकृत तर ४० अनधिकृत जाहिरात फलक आढळुन आले आहेत. यात झोन क्र.१ अंतर्गत २०, झोन क्र.२ अंतर्गत १३ तर झोन क्र.३ अंतर्गत ७ अनधिकृत फलक आहेत.

सोने पहिल्यांदाच 74 हजारांच्या वर
एकाच दिवसात 6 हजार रुपयांनी वाढ

आज 21 मे रोजी सोने आणि चांदीने उच्चांक गाठला. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 839 रुपयांनी महागून 74,222 रुपये झाली. चांदीनेही आज उच्चांक गाठला आहे. चांदी 6,071 रुपयांनी महागली आणि प्रति किलो 92,444 रुपयांवर पोहोचली. यापूर्वी सोमवार, 20 मे रोजी ती 86,373 रुपयांवर होती. यावर्षी आतापर्यंत सोन्याच्या किमतीत 10,870 रुपयांनी वाढ झाली आहे. 1 जानेवारीला सोन्याचा भाव 63,352 रुपये होता, तो आता 74,222 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. त्याच वेळी, एक किलो चांदीचा भाव 73,395 रुपयांवरून 92,444 रुपयांवर पोहोचला आहे.

मंदिर परिसर मद्य मांस मुक्त करणार
महाराष्ट्र मंदिर महासंघाची मोहीम
महाराष्ट्र मंदिर महासंघाने मंदिर परिसर मद्य आणि मांस मुक्त करण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा उद्देश मंदिरांचे पावित्र्य आणि पवित्रता राखणे हा आहे. महासंघ सरकारीकरण झालेल्या देवस्थानांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचाही आग्रह करत आहे. अलीकडच्या काळात काही मंदिरांमध्ये मद्य आणि मांसाचा वापर वाढल्याने अनेक धार्मिक संघटनांनी आणि व्यक्तींनी चिंता व्यक्त केली आहे. मंदिर परिसर हे पवित्र स्थान मानले जाते आणि अशा ठिकाणी मद्य आणि मांस सेवन करणे योग्य नाही असे मत यांचे आहे.

धर्माधारित आरक्षणाला विरोध
राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाची मागणी

कधी आर्थिक आधारावर तर कधी धार्मिक आधारावर आरक्षणासाठी संविधानांतर्गत आरक्षणाच्या मूलतत्वाला वाकवण्यात आले. आता काही राजकीय मुस्लिम समुदायासाठी धर्म आधारित आरक्षण देण्याची भाषा करीत आहेत. एकूणच आरक्षणासाठी संविधानाच्या मूलतत्वाची कितीदा मोडतोड करणार असा सवाल राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाने केला आहे.

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा