Home Breaking news Prostitution : कॉलेजच्या तरुणी देहविक्रय व्यवसायात; पाच जण ताब्यात

Prostitution : कॉलेजच्या तरुणी देहविक्रय व्यवसायात; पाच जण ताब्यात

0

नागपूर(Nagpur ):- मागील काही दिवसांपासून नागपूर शहरात देहव्यापाराचे अड्डे मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यात अल्पवयीन मुलींसह महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तरुणी झटपट पैसा कमावण्याच्या नादात या दलदलीत अडकू लागल्या आहे. गुन्हे शाखेने जोरदार कारवाई करत रविवारी दोन देहव्यापाराच्या अड्ड्यांवर घातलेल्या छाप्या घातला त्यात ही बाब उघड झाली.

नागपूर शहरातील सदर येते छावणी परिसरात एका सलूनच्या आड सुरू असलेल्या देहविक्री अड्ड्यावर पोलिसांनी छापा घातला. तेथून 4 देहविक्री करणाऱ्या तरुणींची सुटका करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी सलून चालक महिलेसह दोन ग्राहक, अशा 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. साक्षी ऊर्फ मनीषा चंद्राहास तुपे वय 30 वर्ष, रा. उर्वेला कॉलोनी, वर्धा रोड, राकेश साबुलाल बंदेवार ऊर्फ राज ठाकूर वय 33 वर्ष, रा. उज्ज्वलनगर, सोमलवाडा, अभिषेक प्रभाकर माहुरे वय 32 वर्ष, रा. प्लॉट नं. ८९ मनीषनगर, मोहन भगवंतराव सुरकर वय 40 वर्ष, रा. निलडोह, हिंगणा व राजेंद्र चिंतमणराव पांडे वय 52 वर्ष, रा. वानाडोंगरी, हिंगणा अशी आरोपींची नावे आहेत.

आरोपी महिला मनीषा तुपे छावणी येथील ‘द लुक लक्झरी सलून स्पा’मधून देहव्यापार करत होती. मागील 6 वर्षांपासून ती या व्यवसायाशी जुळलेली आहे. अल्पवयीन मुली आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना जाळ्यात ओढून त्यांना ब्युटी पार्लरमधून आंबटशौकीन ग्राहकांकडे पोहोचवण्याचे काम ती करीत होती. मनीषाने आतापर्यंत याच व्यवसायातून लाखोंची कमाई केली. तिने शंभरावर मुलींना शहरातील वेगवेगळ्या स्पा-सलूनमध्ये देहव्यापारासाठी पाठवल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपी मनीषा हिच्या देहव्यवसायची पोलखोल करण्यासाठी गुन्हे शाखेने एक बनावट ग्राहक तेथे पाठवला. मनीषाने एका तरुणीला त्याच्यासोबत पाठवले. त्याने इशारा करताच पोलिसांनी छापा घातला. आरोपी मनीषा, राकेश व अभिषेक हे चार तरुणींना देहव्यापार करण्यास प्रवृत्त करताना आढळले. याशिवाय, मोहन व राजेंद्र हे तिथे ग्राहक म्हणून मिळून आले. पोलिसांनी आरोपींच्या तावडीतून त्या चारही तरुणींची सुटका केली आणि 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला