Home Breaking news नितीन गडकरींच्या हस्ते ‘श्री गजानन विजय ध्वनी ग्रंथ’ पोस्टरचे प्रकाशन

नितीन गडकरींच्या हस्ते ‘श्री गजानन विजय ध्वनी ग्रंथ’ पोस्टरचे प्रकाशन

0

देशांत प्रथम ध्वनी-चित्र ग्रंथ भक्तांसाठी तयार!
नागपूर :
श्री गजानन महाराजांच्या प्रचितीवर आधारित ‘श्री गजानन विजय ध्वनी ग्रंथ’ हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील अनोखे साधन लवकरच भक्तांना समर्पित होणार आहे. या ग्रंथाच्या पोस्टरचे आज गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथे स्नेहपूर्ण प्रकाशन झाले. हा ग्रंथ केवळ वाचनीयच नव्हे, तर ध्वनी-सक्षम असल्याने ऐकता येणारा देशातील पहिला ग्रंथ म्हणून चर्चेत आहे.ग्रंथनिर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या प्रा. गिरीश देशमुख, डॉ. अश्विनी देशमुख, उमेश महाजन, उदय महाजन, अमर इंदूरकर, डॉ. माधुरी इंदूरकर, संगीतकार विरेंद्र लाटणकर, निर्मिती सहाय्यक अजय बिवडे व ध्वनी संयोजक महेश तिवारी यांची याप्रसंगी उपस्थिती होती. इन्स्टाग्रोथ मर्चँडाइज एलएलपीने निर्मिती केली असून, श्याम पेठकर व भाग्यश्री पेठकर यांच्या मार्गदर्शनात ‘वर्ड्स अँड व्ह्यूज’ संस्थेने करिता लेखन पूर्ण केले. भजनलेखन महेंद्र पेंढारकर, चित्रे उमेश चारोळे व संजय मेश्राम, संगीत नियोजन पवन तिवारी, मांडणी व सजावट राजेंद्र क्षीरसागर व प्रशांत वानखेडे यांचे सहकार्य लाभले.ग्रंथाची अनोखी वैशिष्ट्ये:५०० पानांचा भव्य ग्रंथ आकर्षक बॉक्समध्ये पॅक.महाराजांच्या लीलांवरील २५० हून अधिक रंगीत चित्रे.सोबत विशेष सेंसर – टेकला की संपूर्ण ग्रंथ ऐकता येईल.२१ अध्यायांना संगीतमय चाली; सेंसरने प्रत्येक अध्याय श्रवणीय.श्लोक, निरूपण, लीला-व्यक्ती-स्थळांची माहिती मराठी, हिंदी व इंग्रजीत.प्रत्येक अध्यायाच्या शेवटी बोधवाक्ये – तीनही भाषांत ऐकता येतील.चित्रावर सेंसर टेकला की भजन सुरीली चालीत वाजेल.हा प्रेक्षणीय, वाचनीय व श्रवणीय ग्रंथ भक्तांसाठी वरदानासारखा आहे. गडकरी यांनी प्रकाशनावेळी भक्तीमार्गातील अशा संकल्पनांचे महत्त्व अधोरेखित केले. लवकरच बाजारात उपलब्ध होणाऱ्या या ग्रंथाने गजाननभक्तीला नवे आयाम मिळणार आहेत.