पंजाब सरकार पुरविणार “आरोग्यवर्धक” देशी दारू

0

नवी दिल्ली -पंजाबमध्ये अवैध दारुचा सुळसुळाट असून त्यावर नियंत्रण आणण्यात अपयश येत आहे. विषारी दारुचा धोका असताना पंजाबमधील भगवंतसिंग मान सरकारने राज्यात “आरोग्यवर्धक” देशी दारू (Punjab Government to introduce Healthy) आणण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सरकारने सर्वोच्च न्यायालयात एक शपथपत्र दाखल केले असून त्यात सरकारने अवैध दारुला पर्याय म्हणून अल्कोहोलचे प्रमाण केवळ ४० टक्के असलेली देशी दारु बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात विषारी दारुचा महापूर कमी करण्यासाठी सरकारने हा उपाय शोधून काढला आहे.

या निर्णयामुळे लोक विषारी गावठी दारुपासून दूर राहतील, असा सरकारचा कयास आहे. स्वस्त देशी दारूचे उत्पादन आणि विक्रीचे पाऊल हा पंजाब सरकारच्या नव्या उत्पादन शुल्क धोरणाचाच एक भाग आहे. फिल्ड अधिकाऱ्याना स्थानिक पातळीवरील माहितीच्या आधारे ४० टक्के डिग्री स्ट्रेंथ दारुच्या आवश्यकतेनुसार पुरवठा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. जेणेकरून अवैध दारू विक्री होत असलेल्या परिसरात सरकारची आरोग्यदायी दारू उपलब्ध करून देता येईल. उत्पादन शुल्क विभागाच्या या शपथपत्रात म्हटले आहे की, सरकार अवैध दारू विक्रीला सरकारच्या देशी दारूच्या माध्यमातून स्वस्त पर्याय देण्यात येणार आहे.


पंजाबमध्ये ग्रामीण भागात लहान या दारुचे प्रचलन अधिक आहे. त्यात अल्कोहोलचे प्रमाण कमी म्हणजे ५० ते ६० टक्के असते. या दारुला पर्याय देण्यासाठी पंजाब सरकारने काही डिस्टीलरीजशी चर्चा केली असून त्यांनी अशा प्रकारच्या दारुची निर्मिती करण्याची तयारी दर्शविली असल्याचे शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे. सध्या बिहारमध्ये विषारी दारुमुळे किमान ५० लोकांचे मृत्यू झाल्याच्या घटना पुढे आल्या असून त्यामुळे तेथील सरकारवर टिकेची झोड उठत आहे.