उध्दव ठाकरे यांच्या माध्यमातुन संजीवनी मिळेल अशी राहुल गांधी यांना अपेक्षा – आ. बच्चु कडू

0

अमरावती : शिवसेनेचे नेते उध्दव ठाकरे यांच्या भेटीकरीता कॉंग्रेस नेते राहूल गांधी मातोश्रीवर येणार आहेत. या भेटीच्या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. उध्दव ठाकरे यांच्यामाध्यमातून संजीवनी मिळेल अशी राहुल गांधी यांना अपेक्षा आहे. राहुल गांधी यांच्या पदयात्रेनंतर जो फरक सामान्य माणसांवर पडला पाहिजे होता तर तो फरक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर देखील पडला नाही. राहूल गांधीच्या भारत जोडो यात्रेचा त्यांच्या कार्यकर्त्यांवरच परीणाम पडला नाही तर जनतेवर कसा पडणार? असा सवाल उपस्थित करीत शिवसेनेमुळे कॉंग्रेसला नव संजीवनी मिळत असेल तर ही चांगली गोष्ट असल्याचेही यावेळी कडू म्हणाले.