
चंद्रपूर (Chandrapur) :
स्थानिक जनता महाविद्यालय येथील वाचनालय विभागात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आज (दि.३१) ला साजरी करण्यात आली.
यावेळी चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी डॉ. अशोक जीवतोडे, प्राचार्य डॉ. आशिष महातळे, उपप्राचार्य डॉ. के.सी. पाटील, डॉ. दीपिका संतोषवार, सौ. कविता रंगारी, रजिस्ट्रार दिनकर अडबाले, डॉ. पत्तीवार, डॉ. प्रशांत चहारे, डॉ. प्रवीण जोगी, गजानन काळे व इतर शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या जयंती निमित्त राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. डॉ. अशोक जीवतोडे यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांचा आदर्श महिला व पुरुषांनी घ्यावा, असे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. महेश यार्दी तर आभार प्रा. रवि जोगी यांनी केले.