दारव्‍हेकर मास्तरांच्या जन्‍मशताब्‍दी वर्षाच्‍या प्रारंभानिमित्‍त विदर्भ साहित्य संघाचे विशेष आयोजन

0
दारव्‍हेकर मास्तरांच्या जन्‍मशताब्‍दी वर्षाच्‍या प्रारंभानिमित्‍त विदर्भ साहित्य संघाचे विशेष आयोजन
दारव्‍हेकर मास्तरांच्या जन्‍मशताब्‍दी वर्षाच्‍या प्रारंभानिमित्‍त विदर्भ साहित्य संघाचे विशेष आयोजन

नागपूर (Nagpur) 29 मे :- 

नागपूर नगरी आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या अजरामर नाट्यकृतींनी नावाजलेले आणि नाट्य रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे सुप्रसिद्ध नाटककार स्वर्गीय पुरुषोत्तम दारव्हेकर यांचा १ जून हा जन्मदिवस आहे. यंदा त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे केले जाणार आहे. त्यानिमित्ताने विदर्भ साहित्य संघाच्या वतीने रविवार, १ जून रोजी संध्याकाळी 5.30 वाजता त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथ सहवासमध्‍ये होणा-या या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध नाटककार प्रा. महेश एलकुंचवार प्रामुख्याने उपस्थित राहणार असून विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. साहित्य रसिक आणि नाट्य प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.