तीन कथाकारांच्‍या कथांचे अभिवाचन ‘कथाब्‍द’ 29 रोजी

0

नागपूर, 27 एप्रिल 2023 – (Nagpur)विदर्भ साहित्‍य संघातर्फे प्रसिद्ध कथाकार शांताराम, गंगाधर गाडगीळ व जी. ए. कुळकर्णी या तीन कथाकारांच्‍या जन्‍मशताब्‍दीप्रीत्‍यर्थ शनिवार, 29 एप्रिल 2023 रोजी ‘कथाब्‍द’ हा अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला आहे. अमेय दालन, (Vidarbha Sahitya Sangh,)विदर्भ साहित्‍य संघ, झांशी राणी चौक, सीताबर्डी येथे सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होईल.

यात शांताराम यांच्‍या(Andharvata) ‘अंधारवाट’ या कथेचे अभिवाचन विवेक अलोणी करणार असून(Gangadhar Gadgil)गंगाधर गाडगीळ यांच्‍या ‘कडू आणि गोड’ या कथेचे अभिवाचन (Vrishali Deshpande)वृषाली देशपांडे करणार आहेत.(G. A. Kulkarni)जी. ए. कुळकर्णी यांच्‍या (Kākaṇē)‘काकणे’ या कथेचे अभिवाचन अंजली दुरुगकर करतील. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन अरविंद उपाध्‍ये यांचे आहे. कार्यक्रमाचा साहित्‍यप्रेमींनी आस्‍वाद घ्‍यावा, असे आवाहन विदर्भ साहित्‍य संघातर्फे करण्‍यात आले आहे.

 

पनीर भुर्जी करी आणि आटा व्हेज टिकीया | Paneer Bhurji Curry Recipe |Atta Veg Tikkiya Recipe |Ep- 117