Home Top News “मंगेशकरांच्या सुरांची उजळणी; ‘स्वरयात्रा’ कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध”

“मंगेशकरांच्या सुरांची उजळणी; ‘स्वरयात्रा’ कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध”

0

नागपूर, १८ मार्च : केबीबीएफ इंटरनॅशनल प्रा. लि. आणि कऱ्हाडे ब्राह्मण संघ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला ‘स्वरयात्रा’ या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम बुधवारी शंकरनगर येथील साई सभागृहात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. टाळ्या आणि शिट्यांच्या गजरात कलाकारांचे कौतुक करण्यात आले. प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून स्थायी समिती, मनपा नागपूरच्या अध्यक्षा शिवानी दाणी-वखरे उपस्थित होत्या.
कार्यक्रमात लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ मंगेशकर यांच्या अविस्मरणीय संगीत प्रवासाची उजळणी व आठवणींना उजाळा देण्यात आला. गायक कलाकार सुरभी ढोमणे यांनी “मानून घे आई”, “मोगरा फुलला”, “वारा गाई गाणे”, “ये दिल और उनकी”, “आनंद वन भुवनी” ही गीते सादर केली. सारंग जोशी यांनी “दयाघना” ” जिंदगी आ रहा हू मै” हे गीत सादर केले. तर निकेता जोशी यांनी “हृणूझूणू हृणूझूणू रे भ्रमरा”, “चांदण्यात फिरताना”, “पिया तो से नैना”, “पायोजी मैने राम रतन” ही गीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. निकेत जोशी यांनी गायलेल्या “पिया बावरी” या गाण्याला, तर सुरभी ढोमणे यांच्या “यारा सिली सिली” या गाण्यांना प्रेक्षकांकडून वन्स मोअर ची उत्स्फूर्त दाद आली.
याशिवाय “मी रात टाकली”, “गोमू संगतीनं”, “वादळ वारं सुटलं रं”, “जांभूळ पिकल्या झाडाखाली”, “सांग सांग भोलानाथ”, “आई मला पावसात जाऊ दे”, “असावा सुंदर चॉकलेटचा बंगला”, “डोलकर दर्याचा राजा”, “उष:काल होता होता”, “छबिदार छबी” आणि “मराठी पाऊल पडते पुढे” यांसारखी बहारदार गीते सादर करण्यात आली.
संगीत साथीसाठी कीबोर्डवर परिमल जोशी, ऑक्टोपॅडवर महेंद्र वातुळकर, तबल्यावर पंकज यादव, ढोलकवर अशोक टोकलवार, साइड रिदमवर विक्रम जोशी आणि गिटारवर ऋग्वेद पांडे यांनी उत्तम साथ दिली. कार्यक्रमाचे निवेदन सना पंडित आणि स्वप्नील घाटे यांनी प्रभावीपणे केले. हा कार्यक्रम श्री पद्मिनी , घुगरे, श्रेयस एअरकॉन, श्री सिद्धिविनायक पब्लिसिटी, डॉक्टर शहाणे पंचकर्म सर्व्हिस अँड आयुर्वेदिक प्रॉडक्ट, पॅरामाउंट इंजीनियरिंग कंपनी, डिक्सन्स, ग्रीन पोषण, सूर्या ऑफसेट, मीनाक्षी ब्युटी क्लिनिक अँड पार्लर आणि श्री कार्ड्स यांच्या सहकार्याने संपन्न झाला.

#Swaryatra #NagpurEvents #GudiPadwa2026 #SangeetRajani #KBBFInternational #KarhadeBrahmanSanghNagpur #MangeshkarLegacy #LataMangeshkarTribute #AshaBhosleHits #MarathiSongs #SurbhiDhomne #NiketaJoshi #SarangJoshi #LiveOrchestraNagpur #NagpurCultural #MarathiBana #GudiPadwaCelebration #SaiSabhagruhNagpur #ShivaniDaniWakhare #MarathiMusicLover #MusicalNight #NagpurCity #MarathiAsmita #EvergreenMelodies #VocalPerformance #GoldenEraMusic #CulturalNagpur #MarathiNewYear #MusicConcert #SanaPandit #SwapnilGhate