विदर्भ साहित्य संघातर्फे पटकथालेखन कार्यशाळेचे 25 व 26 रोजी आयोजन इब्राहीम अफगाण यांचे लाभणार मार्गदर्शन

0

 

नागपूर :महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि विदर्भ साहित्य संघाच्या संयुक्त विद्यमाने नवोदित लेखकांसाठी दोन दिवसीय पटकथालेखन कार्यशाळेच आयोजन विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात दि. २५ आणि २६ मार्च या तारखांना केले आहे.सुप्रसिध्द पटकथालेखक आणि अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त श्री.इब्राहीम अफगाण हे या कार्यशाळेत सहभागी लेखकांना दोन दिवस मार्गदर्शन करणार आहेत. चित्रपट, दूरदर्शन मालिका या माध्यमांमध्ये अलीकडे नव्या पटकथालेखकांची वाढती मागणी लक्षात घेऊन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.कथेची पटकथा कशी लिहिली जाते,कथेतील तंत्र आणि पटकथेतील तंत्र यात काय फरक आहे,कथेतील मूळ घटक आणि त्यांचा पटकथेत होणारा विकास इत्यादीसंबंधीची मूलभूत विचार, अभ्यास आणि मार्गदर्शन या कार्यशाळेत केले जाणार आहे.
श्री.इब्राहीम अफगाण हे गेली पंधरा वर्षे अशाप्रकारच्या पटकथालेखन शिबिरांतून व कार्यशाळांतून नव्या पटकथा लेखकांना मार्गदर्शन करीत आले आहेत. मुळात पत्रकार म्हणून त्यांनी गोमंतक, सकाळ आणि महाराष्ट्र टाइम्स इत्यादी महत्त्वाच्या वृत्तपत्रांतून त्यांनी वरिष्ठ संपादक आणि संपादक या पदांवर कार्य केले आहे.
प्रस्तुत पटकथालेखन कार्यशाळा दि.२५ आणि २६ या दिवशी स. ९ ते दुपारी ४ वा वेळेत होईल. यात प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य या तत्त्वावरच नवोदित लेखकांना प्रवेश देण्यात येणार आहे.ज्यांना या कार्यशाळेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी आपली नावे दि. २० मार्च पर्यंत ९४२२१०४२५२, ९८२२२३०७४३ या क्रमांकावर किंवा किंवा प्रत्यक्ष कार्यालयात संपर्क साधून आपली नोंदणी करावी.

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा