Home Breaking news ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व बालरोग तज्ञ डॉ. गोपाल मुंदडा यांचे आकस्मिक निधन

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व बालरोग तज्ञ डॉ. गोपाल मुंदडा यांचे आकस्मिक निधन

0

चंद्रपूर | प्रतिनिधी
चंद्रपूर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ बालरोग तज्ञ तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉ. गोपाल मुंदडा यांचे गुरुवार, दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ५ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. मृत्यूसमयी ते ७८ वर्षांचे होते.
चंद्रपूर शहरातील प्रदूषण कमी व्हावे, वाहतूक कोंडी टळावी तसेच जटपुरा गेटचा ऐतिहासिक वारसा जपत शहर विकासासाठी उपयोगात आणावा, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. रुग्णसेवेबरोबरच सामाजिक भान जपत उपेक्षित व गरजू नागरिकांना मदतीचा हात देण्याची त्यांची वृत्ती कायम राहिली.
सामाजिक क्षेत्रात ते नेहमी सक्रिय राहिले. मनमिळावू स्वभावामुळे अनेकांचे ते आधारस्तंभ होते.
आज सायंकाळी ५ वाजता शांतिधाम स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ, डॉ. मनीष व आशिष ही दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे.
डॉ. गोपाल मुंदडा यांच्या निधनाने चंद्रपूरच्या वैद्यकीय, सामाजिक व पर्यावरण चळवळीला मोठा धक्का बसला असून सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.