मुंबई : राज्यात गाजलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक बड्या नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचा गंभीर आरोप गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त राहिलेल्या शुक्ला यांच्यावर होता. या प्रकरणात पुणे पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट पुणे न्यायालयाने फेटाळला आहे. रश्मी शुक्ला यांना या प्रकरणात क्लिनचीट देण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास देखील झाला (Rashmi Shukla Phone tapping case). मात्र या तपासातून काहीही निष्पन्न झाले नाही. यानंतर रश्मी शुक्ला यांनी पोलिस विभागाकडून क्लीन चिट देण्यात आली. तसेच यासंदर्भात पुणे न्यायालयात दाखल करण्यात आला होता, जो न्यायालयाने फेटाळला आहे. काँग्रेसचे तत्कालीन मंत्री नाना पटोले,संजय राऊत, खासदार संजय काकडे, नाथाभाऊ खडसे यांच्यासह अनेक दिग्गज आमदार आणि खासदारांचे रश्मी शुक्ला याच्यावर आरोप आहेत. कुलाबा पोलिसांनी 2019 मध्ये या नेत्यांचे फोन टॅप केल्याबद्दल शुक्ला यांच्याविरुद्ध मार्चमध्ये गुन्हा दाखल केला होता.
महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात येण्यापूर्वी नेत्यांचे फोन टॅप करण्याचे प्रकार घडले होते. यात तत्कालीन गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुल्का यांनी पूर्वपरवानगी न घेता परस्पर फोन टॅप करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा करण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले होते. रश्मी शुक्ला यांच्यावर टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल आहे.
फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांना धक्का, न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट फेटाळला
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा