
बीडच्या सरपंच संतोष देशमुख (Beed Sarpanch Santosh Deshmukh)यांच्या हत्येच्या प्रकरणी सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात हत्येसाठी वापरलेल्या हत्यारांची रेखाचित्रे समोर आली आहेत. आरोपपत्रात संतोष देशमुखांना केलेल्या अमानुष मारहाणीचेही तपशील आहेत.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी कसून चौकशी सुरु आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी नवनवीन खुलासे होत असताना आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांची हत्या करतेवेळी वापरण्यात आलेल्या हत्यारांची रेखाचित्रे आता समोर आली आहेत. संतोष देशमुखांच्या हत्येसाठी याच हत्यारांचा आरोप करण्यात आल्याचे समोर आले आहे.
हत्यारांची रेखाचित्रं समोर
संतोष देशमुख यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली. त्यांना मारहाण करतानाचे काही फोटो आणि व्हिडीओही व्हायरल झाले. यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर याप्रकरणी सीआयडीकडून कसून चौकशी सुरु आहे. सीआयडीने याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्राद्वारे अनेक खुलासे समोर येताना दिसत आहेत.
संतोष देशमुख यांची हत्या करण्यासाठी आरोपींनी जी हत्यारे वापरली होती, ती सर्व हत्यारं सीआयडीच्या ताब्यात आहेत. काही हत्यारे ही सुस्थितीत आहेत. तर काही हत्यारांचे तुकडे झाले होते. ते देखील जप्त करण्यात आले होते. तसेच काही हत्यारांची रेखाचित्रं ही सीआयडीने बनवलेली आहेत. ती आरोपपत्रात जोडलेली आहेत. त्याचा रेखाचित्र समोर आली आहेत.
आरोपपत्रात माहिती नमूद
या हत्याचारांचा वापर करुन आरोपींनी संतोष देखमुखांची हत्या केली होती. त्यांना या हत्यारांचा वापर करुन निर्घृणपणे मारण्यात आले होते. त्यांना अमानुष मारहाणही करण्यात आली होती. या सर्वांचा तपशील सीआयडीने आरोपपत्रात जोडलेला आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी १४०० ते १८०० पानांचे आरोपपत्र तयार करण्यात आले आहे. यातच या हत्याचारांचा तपशील नमूद करण्यात आला आहे. तसेच इतर घटनाक्रमही मांडण्यात आला आहे. या हत्यारांची दृश्य पाहिल्यानंतर कोणालाही भीती वाटेल किंवा काळजाचा थरकाप उडेल अशा पद्धतीने त्या व्हिडीओत संतोष देशमुखांना मारहाण करताना दिसत आहे. याची सर्व माहिती आरोपपत्रात नमूद करण्यात आली आहे.
कोणकोणत्या शस्त्राने मारहाण?
दरम्यान संतोष देशमुख यांना मारहाण करताना पाईपचा वापर करण्यात आला होता. त्यांना मारहाण करतेवेळी या पाईपचे तुकडे झाले होते. या पाईपचे १५ तुकडे सीआयडीने जप्त केले होते. या पाईपच्या १५ तुकड्यांचा फोटो आरोपपत्रात देण्यात आला होता. यानंतर आता या शस्त्रांचा फोटो समोर आला आहे. यात लोखंडी रॉड, पाईप आणि गॅस पाईप अशा शस्त्रांचा उल्लेख करण्यात आला आहे.