नवी दिल्ली (new delhi) : देशात आगामी पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरी 858.6 मिमी म्हणजेत सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज स्कायमेट ने वर्तविला आहे. या कालावधीत ९४ टक्केच पाऊस पडेल, असे या खासगी हवामान विषयक संस्थेचे निष्कर्ष आहेत. (Monsoon 2023 Weather Updates) उत्तर भारत आणि मध्य भारतात पावसाची तूट राहील, असे संकेत देण्यात आले असून गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या मुख्य मान्सून महिन्यां
त पाऊस कमी पडेल, असा अंदाज आहे. तर पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशसह अन्य काही भागात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सामान्यपेक्षा कमी पावसाचे संकेत स्कायमेटने दिले आहेत. स्कायमेटचा हा प्राथमिक अंदाज असून त्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढविल्या आहेत.
एल निनोचा परिणाम?
यंदा कमी पावसाचे मुख्य कारण एल निनोचा परिणाम हे आहे. या हवामान विषयक घडामोडींचा मान्सूनवर परिणाम होणार असल्याचे स्कायमेटचे म्हणणे आहे. यापूर्वीही काही खासगी हवामानविषयक संस्थांनी कमी पावसाचे अंदाज वर्तविले आहेत. अद्याप भारतीय हवामान विभागाचा अंदाज आलेला नसून तो १५ एप्रिलपर्यंत अपेक्षित आहे. त्यानंतर मे महिन्याच्या शेवटी देखील भारतीय हवामान विभागाकडून अंतिम अंदाज वर्तविला जातो.
राज्य सरकारची योजना
दरम्यान, यावर्षी कमी पावसाचा अंदाज असल्याने राज्य सरकार अगोदरच कामाला लागले आहे. मुख्य सचिवांच्या पुढाकाराने एक योजना तयार होत आहे.
यापूर्वीही अनेक संस्थांनी कमी पावसाचे अंदाज वर्तविले आहेत.