तर …आत्मपरीक्षण गरजेचे -आनंद दवे

0

नागपूर NAGPUR  -मुळात सत्यशोधक समाजाची स्थापना का झाली, कशासाठी झाली त्या कालखंडामध्ये कोणत्या भ्रष्ट, अनिष्ट परंपरा होत्या आणि त्यामुळे काही समाज कसा शोषित राहिला, याचा उलगडा या चित्रपटातून केलेला आहे. यामध्ये त्यांनी आक्षेप घेताना शेवटी प्रवीण दादा गायकवाड आणि मेश्राम साहेब यांचे नाव घेतलेले आहे आणि हे कोणत्या विचाराचे आहेत. म्हणजेच या दोन व्यक्ती विषयी स्वतःचे मत ते कसे जातीयवादी आहेत असे व्यक्त केलेले आहे.

परंतु वरील व्यक्तीचा अभ्यास करता ते फक्त एका समाजाचे नेतृत्व करतात आणि त्यांचा देव परशुराम हा लोकांच्या माथी आजही मारतात असे त्यांचे म्हणणे आहे. या चित्रपटांमधून त्या कालखंडातील सत्य परिस्थिती मांडलेली आहे यावर कोणीही आक्षेप घ्यावा असे यात दिसून येत नाही. या चित्रपटासाठी मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब तसेच माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा तसेच इतरही अनेक मान्यवरांनी मदत केलेली आहे आणि सत्य मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटामधून झालेला आहे.

ज्यांनी या चित्रपटाला विरोध दर्शविला यांच्या बाबतीत अभ्यास केला असता हे पुन्हा एकदा 1900 च्या शतकातील ब्राह्मण ब्राह्मणोत्तर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न ही व्यक्ती करीत आहे. आजचा समाज सुज्ञ आहे.काय खरे, काय खोटे याची जाण या आताच्या समाजाला आहे. त्यामुळे या चित्रपटाला विरोध करणे जातीयवाद निर्माण केल्यासारखे आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तींनी आत्मपरीक्षण करून घेणे गरजेचे आहे अशी भावना पुण्यातील ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी ‘शंखनाद’शी बोलताना व्यक्त केली.