
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील घटना, आरोपी मुलास अटक
चंद्रपूर(Chandrapur):चंद्रपुरात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. कारल्याची भाजी बनवली या शुल्लक कारणावरून मुलाने आपल्या आईची हत्या केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील डोंगरगाव येथे उघडकीस आली. सुमित्रा पेटकुले (६५) असे मृतक महिलेचं नाव आहे. आरोपी मुलाचे नाव जगदीश पेटकुले (37) आहे. सुमित्रा यांना लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केल्यामुळे ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.आरोपीला दारूचे व्यसन होते. दोन महिन्यांपूर्वी पत्नी घर सोडून गेल्याने तो आईसोबत राहत होता. रात्री दारूच्या नशेत त्याने हे क्रूर कृत्य केल्याची घटना समोर येताच गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच मूल पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
















