उन्हाचा तडाखा वाढल्याने महाराजबाग प्राणीसंग्रहालयात प्राण्यांसाठी विशेष व्यवस्था

0

 

नागपूर – नागपूरच्या डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठामार्फत संचालित महाराजबाग प्राणिसंग्रहालय प्रशासनाने वाढत्या उष्णतेपासून प्राण्यांना वाचवण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही वाढत्या उन्हामुळे प्राणिसंग्रहालय प्रशासनाने विविध प्राण्यांसाठी वेगवेगळी व्यवस्था केली आहे. सोमवारी नागपूर विदर्भच नव्हे तर राज्यात सर्वाधिक उष्ण होते. उष्णतेच्या प्रकोपामुळे माणसांबरोबरच प्राण्यांना देखील त्रास होतो. ही बाब लक्षात घेऊन नागपूरच्या महाराजबाग प्राणिसंग्रहालय व्यवस्थापनाकडून प्राण्यांना उन्हापासून वाचवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. नागपुरात सुमारे 43 ते 44 अंश सेल्सिअस तापमानामुळे तीव्र उष्णतेचा प्रकोप सुरूच आहे. या उष्णतेमुळे माणसांबरोबरच प्राण्यांचेही हाल होत आहेत. महाराज बाग प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी प्राणिसंग्रहालय प्रशासनाने येथील प्राण्यांच्या पिंजऱ्यांमध्ये एअर कुलर, कारंजे, जलाशयाची व्यवस्था केली आहे. यासोबतच सूर्याची थेट किरणे प्राण्यांवर पडू नयेत म्हणून पिंजऱ्यांवर हिरवी जाळीही टाकण्यात आली आहे, हरिण आणि नीलगाय यांना रसदार फळे दिली जात आहेत. जेणेकरुन या प्राण्यांना उष्माघाताचा धोका कमी करता येईल अशी माहिती डॉ. अभिजित मोटघरे यांनी दिली.

 

विदर्भात ढगाळ वातावरण, पारा घसरला गोंदिया सर्वाधिक 42.8

नागपूर : दोन तीन दिवसात ढगाळ वातावरण असल्याने पारा खाली घसरला आहे. आज मंगळवारी पूर्व विदर्भात गोंदिया सर्वाधिक 42.8 अंश से.तापमानाची नोंद झाली. या खालोखाल चंद्रपूरला 42.4 तर अमरावती आणि नागपूरला 41.8 असे तापमान होते. विदर्भात नवतपापूर्वीच दुपारी उन्हाच्या झळा असह्य होत आहेत. आज विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तापमानाचा विचार करता अकोला 41.7,वर्धा (42.0),ब्रम्हपुरी (41.2), गडचिरोली (41.2), बुलडाणा (38.4), यवतमाळ (39.5) याप्रमाणे तापमानाची नोंद झाली. ढगाळ वातावरण, पावसाच्या हजेरीने विदर्भात काहीसे तापमान कमी झाल्याचे अनुभवास येत आहे. वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.