खासदार औद्योगिक महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

नागपूर (Nagpur) – केंद्रीय मंत्री आणि खासदार नितीन गडकरी यांच्या वतीने 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान खासदार औद्योगिक महोत्सव जमनालाल बजाज भवन परिसरात आयोजित करण्यात आला आहे. धनवटे नॅशनल कॉलेजच्या करिअर संसदच्या सहकार्याने होणाऱ्या या महोत्सवात विद्यार्थ्यांना उद्योग आणि व्यवसाय संधींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या महोत्सवाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना उद्योग जगतातील संधी, स्टार्टअप्स, आधुनिक तंत्रज्ञान आणि सरकारी योजनांबद्दल माहिती देणे हा आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना विविध औद्योगिक कंपन्यांच्या स्टॉल्सना भेट देण्याची संधी मिळणार असून, तज्ज्ञ मार्गदर्शक त्यांना उद्योग, व्यवसाय, सरकारी योजना, स्टार्टअप्ससाठी मिळणारा पाठिंबा आणि नोकरीच्या संधींबाबत सविस्तर माहिती देतील.

महोत्सवाच्या आयोजनात धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे आणि समन्वयक डॉ. पराग जोशी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आदेश मरापे, माहिती व प्रसारण मंत्री सुमित ठाकरे,सुहानी धनगर , अनिकेत कांबळे, स्वाती भारती, समीक्षा भोसले , लावण्या राऊत, प्रणाली मडावी तसेच विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.