

नाशिक येथे पुरस्काराचे प्रदान
चंद्रपूर (Chandrapur) :- अखिल भारतीय सक्षम टाइम्स मीडिया फाउंडेशन व सक्षम पोलीस टाइम्स यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी देण्यात येणारा राज्यस्तरीय “दर्पणकार” पुरस्कार यावर्षी शहरातील पत्रकार अतुल कोल्हे यांना जाहीर करण्यात आला. सदर पुरस्काराचे प्रदान त्यांना नाशिक येथील वर्च्यु हॉल येथे 5 जानेवारीला आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
अतुल कोल्हे हे शहरात अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून आपल्या लेखणी द्वारे ते सामाजिक समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य अविरतपणे करीत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे शहरात तसेच चंद्रपूर जिल्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















