महावितरणची चोरीला गेलेली ६ क्विंटल वीज तार पकडली

0

 

बुलढाणा – मलकापूर रोडवरील आशिर्वाद ढाब्याजवळ एका मालवाहू गाडीवर छापा टाकला असता पोलिसांना त्यामध्ये ६०० किलो महावितरणच्या अल्युमिनियम तारेसह विविध कंपन्यांच्या १३ बॅटऱ्या, तसेच शहरातील सिद्धिकियानगरमधील गोदामातून तांब्याचे तार, पितळी वस्तू, असा एकूण पाच लाख दहा हजार आठशे आठ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. मलकापूर पोलिस उपविभागात मालमत्तेविरुद्ध घडलेल्या गुन्ह्यांचा समांतर तपास करण्याच्या उद्देशाने स्थानिक गुन्हे शाखा बुलढाण्याचे पथक गस्त घालीत असताना ही कारवाई करण्यात आली. मालवाहू वाहन क्रमांक एम पी – जिजे १२८४ ची तपासणी केली असता त्यामध्ये अल्यूमिनियमची वापरात येणारी ६०० किलो तार, विविध कंपन्यांच्या बॅटऱ्या व इतर साहित्याची वाहतूक करताना दोन आरोपी मिळून आले. आरोपींना विचारणा केली असता ते साहित्य शहरातील सिद्धिकियानगरमधील भंगार गोदामातील असल्याचे सांगितल्याने. पथक व नांदुरा पोलिसांनी भंगार गोदाम तपासले तेथे महावितरणची ५६ किलो तार, तांब्याची ९३ किलो तार, ३ पितळी वस्तू जाळलेले अल्युमिनियमचे १३ किलो तार असा चोरीचा माल मिळून आला. तर आरोपींविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४१ (१) (ड) भादंविच्या कलम ३७९ सहकलम भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३६ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला. असून यामध्ये गोदाम मालक आरोपी शेख साबीर शेख निसार (४२), रा. कुरेशीनगर, नांदुरा, राजीव मुरारीलाल बमोरिया (२१), रा. पिपलियारओ, चौधरा मंडी, इंदूर (म.प्र.), सुनील प्रल्हाद आटुदे (१९), रा. मोरटक्का, मोरधडी, जि. खंडवा (म.प्र.) या तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली अशी माहिती अनिल बेहेरानी (पोलीस निरीक्षक, नांदुरा) यांनी दिली.