
बुलढाणा – टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. त्याचा परिणाम आमच्या किचनवरही झाला आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेता सुनील शेट्टीने व्यक्त केली होती. त्यावरून शेतकरी वर्गातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. टोमॅटो ही काही जीवनावश्यक वस्तू नाही, टोमॅटो खाल्ले नाही तर सुनील शेट्टी मरणार नाही. त्यामुळे सुनील शेट्टींना परवडत नसेल तर अजिबात टोमॅटो खाऊ नये. परंतु, शेतकऱ्यांच्या खिशात दोन पैसे जास्त जात असतील तर सगळ्यांनी त्याचे स्वागत करायला पाहिजे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटना नेते रविकांत तुपकर यांनी सुनील शेट्टीं यांच्यावर केली आहे.