रात्रपाळी महाविद्यालय चंद्रपूर येथील प्राध्यापकाचे सुयश

0

स्थानिक श्री. माता कन्यका सेवा संस्था द्वारा संचालित स्व. डॉ. सच्चिदानंद मूनगंटीवार रात्रपाळी महाविद्यालय वडगाव चंद्रपूर येथे स्थित आहे. मागील दोन वर्षापासून हे महाविद्यालय अविरत ज्ञानदानाचे कार्य करत आहे. खूप कमी वेळेत हे महाविद्यालय नावारूपास आले. बि.ए., बि. कॉम. व बि. एस्सी. हे तिन्ही अभ्यासक्रम गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत येथे सुरू आहेत.

या महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य या पदावर कार्यरत सहा. प्रा. संतोष शिंदे यांना नुकताच वेईल फौंडेशन द्वारे रंबिद्र रत्न पुरस्कार २०२५ प्राप्त झाला. त्यांच्या संगणक क्षेत्रातील कामगिरी लक्षात घेता हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला. हा पुरस्कार प्रा. शिंदे यांनी आपल्या आई बाबांना अर्पण केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळतंय हे बघून सर्वांना आनंद झाला. एस. एन. डी. टी. विद्यापीठ बल्लारपूर परिसराचे संचालक डॉ. आर. पी. इंगोले यांनी विशेष शुभेच्छा दिल्या.

या पुरस्काराकरीता संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रा. शिंदे यांचे कौतुक केले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. सुदेश जी कापरतीवार, उपाध्यक्ष श्री. पीयूष मामीडवार, सचिव श्री. राजेश्वर सुरावार, कोषाध्यक्ष श्री. अनिल दंडमवार, सदस्य श्री. दिलीप नेरलवार, श्री. जसवंत सिंघवी, आणि श्री. उमेश सुरावार यांनी शुभेच्छा दिल्या.