चंद्रपूरची तोफ आता दिल्लीत धडकणार!

0

चंद्रपूरची तोफ आता दिल्लीत धडकणार!

सुधीर मुनगंटीवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

चंद्रपूर: चंद्रपूर विधानसभा असो की बल्लारपूर मतदारसंघाच्या माध्यमातून सुधीर मुनगंटीवार यांनी नेतृत्व करीत राज्यांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. आता ही चंद्रपूरचे तोफ दिल्लीमध्ये धडकणार, असे गौरवोदगार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

चंद्रपूर, वणी आणि आर्णी लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रासप आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या नामांकन रॅलीच्या जाहीर सभेत ते बोलत होते.

 

यावेळी प्रदेश भाजपाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, माजी आमदार आशिष देशमुख, खासदार रामदास तडस, आमदार संदीप दुर्वे, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगर अध्यक्ष राहुल पावडे, माजी महापौर राखी कंचर्लावार उपस्थित होते.

 

शिवाजी चौकापासून ही रॅली निघाली. गांधी चौक येथे जाहीर सभा घेण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन नामांकन अर्ज दाखल करण्यात आला.

 

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही निवडणूक म्हणजे नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार यांना दिलेले प्रत्येक मत हे मोदींना दिलेले मत ठरणार आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करताना चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला आहे. त्यामुळेच महायुतीच्या उमेदवारांचे नामांकन दाखल करण्याची सुरुवात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार यांच्यापासून करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रातील विजयाचा संकल्प हा चंद्रपुरातून होत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

+++++++++

 

निवडणूक जाती-धर्माच्या आधारे

लढली जात नाही – सुधीर मुनगंटीवार

 

कोणतीही निवडणूक ही जाती, धर्म, पंथाच्या आधारावर लढली जात नाही किंवा कुणाला सहानुभूतीवर निवडून येता येत नाही तर विकासाच्या कामावर विजय होत असतो, असे प्रतिपादन सुधीर मुनगंटीवार यांनी केले. लोकसभा निवडणुकीचा नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.

 

मी चंद्रपूर लोकसभेचा पूर्ण शक्तीने विकास करू शकतो. राज्य सरकारचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. केंद्र सरकारचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे आणि जर जातीच्या आधारावर राजकारण होत असेल तर येथे एकच जात नाही तर विविध जाती आहेत. मतदारांनी विकासाच्या कामावर मतदान करावे, जात पाहून नव्हे, असे आवाहन देखील त्यांनी केले. हा देशातील सर्वोत्तम मतदारसंघ ठरावा, यासाठी आपण प्रयत्न करू असेही ते म्हणाले.

यावेळी मुनगंटीवार यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सपना मुनगंटीवार, माजी खासदार हंसराज अहीर, वर्धा चे खासदार रामदास तडस, आमदार संदीप धुर्वे, संजीव रेड्डी बोदकूरवार देखील उपस्थित