सुधीरभाऊंच्या स्वागताची गर्दी बघून “वसंतराव नाईक” यांची झाली आठवण

0

महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे पोहरागडाचे दर्शन

 

मानोरा (Washim) तालुक्यातील बंजारा समाजाची काशी असलेल्या आराध्य दैवत पोहरागड येथे दर्शन घेण्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांचे आगमन झाले. सुधीरभाऊंच्या स्वागताची गर्दी बघून माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची आठवण होऊ लागली. विदर्भाच्या या कोपऱ्यातही सुधीरभाऊंवर प्रेम करणारे असंख्य चाहते असल्याचे दिसून आले. बंजारा समाजाचे महंत, संत, नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी दर्शन घेतले. (poharadevi)

 

दि.२५ मार्च रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान पुसद तालुक्यातील गायमुख नगर येथील हेलीपॅड वर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हेलिकॉप्टर लँड झाले. पुसदकरांना हेलिकॉप्टर ही नवीन गोष्ट नव्हतीच. कारण राज्याला दोन दोन कर्तबगार मुख्यमंत्री देणारा हा तालुका. कै. वसंतराव नाईक, कै. सुधाकरराव नाईक यांच्या रूपाने पुसदमध्ये अनेकदा अशी हेलिकॉप्टर नागरिकांनी मतदारांनी बघितलेले आहेत. मात्र आज सुधीरभाऊंच्या स्वागताकरिता गायमुख नगर येथील हेलीपॅड वर झालेली गर्दी बघून कै.वसंतरावजी नाईक साहेब यांची आठवण आली. स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असणारे जनसमुदाय, कार्यकर्ते, पदाधिकारी बघून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे खऱ्या अर्थानं लोकनेते असल्याचे अधोरेखित झाले. असे भाग्य खूप कमी लोकांना लाभते, त्यातले सुधीर भाऊ. अत्यंत मनमिळाऊ, जनहितार्थ कार्य करणारे असा नावलौकिक असलेले आणि कर्तव्यनिष्ठ सुधीरभाऊना बघून इथली जनता भरावली होती.

 

 

 

 

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बंजारा समाजाची काशी पोहरागड येथील जगदंबेचे दर्शन घेऊन परत पुसद येथे निखिल चिद्दरवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. कार्यकर्त्यांशी नागरिकांची संवाद साधला. त्यानंतर दुपारी पाच वाजताच्या दरम्यान त्यांनी पुसदच्या गायमुख नगर येथील हेलिपॅड वरून हेलिकॉप्टर मध्ये बसून प्रस्थान केले. याप्रसंगी असंख्य कार्यकर्त्यांसह प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 

समाजाची प्रगती आणि पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्‍या विकासामध्‍ये योगदान देण्याची संधी मिळाली, याचे समाधान असून संतांच्या आशीर्वादानेच लोकसेवेत यश मिळत गेले, अशी भावना व्यक्त करून राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सर्वांना धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघाचे लोकसभेचे उमेदवार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवार, 25 मार्च रोजी धुलीवंदनाच्‍या पर्वावर बंजारा समाजाची काशी म्हणून पवित्र असलेल्या श्री क्षेत्र पोहरादेवीचे दर्शन व आशीर्वाद घेतले. ना. मुनगंटीवार यांनी श्री सामकी माता मंदिर, धर्मगुरू संत रामरावबापू आश्रम-संत शिरोमणी शक्तिपीठ, सेवालाल महाराज समाधी स्थळ आणि बंजारा शक्तिपीठ पोहरागड येथेदेखील भेट दिली. भाजपा तालुकाध्‍यक्ष किशन राठोड यांनी हे आयोजन केले होते. याप्रसंगी बंजारा समाजाचे धर्मगुरू श्री बाबूसिंग महाराज, महंत श्री कबीरदास महाराज, महंत श्री जितेंद्र महाराज, महंत श्री शेखर महाराज यांचेही त्‍यांनी आशीर्वाद घेतले. जगदंबा मंदिरात ना. मुनगंटीवार यांचा संस्‍थानतर्फे शाल व श्रीफल देऊन सत्कार आला.

 

यावेळी आमदार संदीप धुर्वे, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, महादेव सुपारे भाजपा जिल्हाध्यक्ष पुसद, भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर हरीश शर्मा,जिल्हा महामंत्री राजू पडगीलवार, राम लाखीया,विपिन राठोड, रविंद्र राठोड, माजी जि. प. सदस्य प्रकाश राठोड, एन. टी. जाधव, रोहित राठोड, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष, निखिल चिद्दरवार, गोवर्धन राठोड, रामसिंग राठोड, अशोक राठोड, शिरीष चिंतावार, विशाल देशमुख, विनोद राठोड, माधव राठोड, विशाल राठोड, अरविंद पवार, योगेश कटोले, प्रमोद बनगींनवार यांची यावेळी उपस्‍थ‍िती होती.

 

लोकनृत्यामध्ये सहभाग

 

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी बंजारा समाजातील बांधवांसोबत लोकनृत्यामध्येही सहभाग घेतला. यावेळी बंजारा समाजातील लोककलावंत वाद्य वाजवत असताना ना. श्री. मुनगंटीवार यांनी उत्स्फूर्तपणे लोकनृत्यावर ठेका धरला.

 

Poharadevi is a village in the Washim district of Maharashtra, India, and is a well-known pilgrimage site. It is the holy place of Banjaras, and is home to the Jagadambadevi temple, which was built in the middle of the village by the Saint Sevalal Maharaj temple. The village also has a religious school for pilgrims.

 

 

 

Poharadevi Temple address

Distance from Washim to Poharadevi

Distance from Akola to Poharadevi