आधी सवय होती; आता व्यसन जडलयं

0

मुनगंटीवारांचा थेट राऊतांवर पलटवार

मुंबई (Mumbai) : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनामधील रोखठोक सदरात नितीन गडकरी यांच्या संदर्भात केलेल्या विधानावर महाआघाडीच्या नेत्यांनी खरडपट्टी काढल्यानंतर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी थेट पलटवार केलाय. संजय राऊतांची खोट बोलण्याची सवय व्यसनात रुपांतरीत झाली आहे. नितीन गडकरींच्या पाठिशी मोदी, शहा आहेत. म्हणूनच ते विकास करू शकले. संजय राऊतांचा आरोप निराधार आहे. वर्तमानपत्रात बातमी यावी म्हणून आरोप करतात, आरोपांना तथ्य नाही. उद्धव ठाकरे यांना CM पदावरून हटवण्यात राऊतांचा हात होता, अशी टीका देखील केली.

माध्यमाशी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी संजय राऊत यांनी प्रयत्न केले आहे. खोट बोलल्याची दुर्दैवाने ही सवय आता व्यसनामध्ये बदलली आहे, गडकरी साहेब हे देशामध्ये सर्वमान्य नेतृत्व आहेत. गडकरींनी एका प्रस्तावावर भाषण दिले. विविध पक्षाच्या 64 खासदारांनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिली. सर्व खासदारांनी संसदेमध्ये त्यांचं कौतुक केलं. आता गडकरींच्या पाठीशी मोदीजी आहे म्हणूनच हे गडकरी करू शकले. गडकरींच्या पाठीशी अमित भैया म्हणूनच हे गडकरींची करू शकले. त्यामुळे राऊत यांचे आरोप निराधार आहे, एकदा जर तुम्हाला टीव्ही चॅनलवर रोज दिसायची सवय लागली. वर्तमानपत्रांमध्ये रोज आपला फोटो किंवा बातमी यावी, हे जर व्यसन जडले , तर काही खरं नाही. पुढल्या जन्मात तरी सूदबुद्धी मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.