‘तेरा भी मुसेवाला कर दूंगा’…संजय राऊतांना जिवे मारण्याच्या धमक्या

0

मुंबईः  ( MUMBAI)राज्यसभा खासदार आणि  (UDDAV GAT)उद्धव गटाचे नेते संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threat to MP Sanjay Raut) मिळाली आहे. आपल्याला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्याचा दावा राऊतांनी केला आहे. आपल्याला धमकी देणाऱ्या व्यक्तीने ‘तेरा भी मुसेवाला कर दूंगा’ (‘Tera Bhi Museva will be done’)असा मेसेज केल्याचा दावा त्यांनी केलाय. संजय राऊत यांना काल रात्री 9 वाजेच्या सुमारास ही धमकी आल्याची माहिती आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी पोलिसांना माहिती दिली आहे.

 

पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याचीही माहिती आहे. तसेच, मुंबई पोलिस आयुक्तांकडेही यासंदर्भात संजय राऊत यांनी तक्रार दिली आहे.दरम्यान, या धमक्यांवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, धमक्या येत असतात पण विरोधकांना आलेल्या धमक्या सध्याचे सरकार गांभीर्याने घेत नाहीत. संपूर्ण(MUMBAI POLICE) पोलीस यंत्रणा गद्दार गटाला सुरक्षा देण्यात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केलाय. ठाण्यातील गुंड टोळीच्या म्होरक्याने मला धमकी दिली होती. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या (CM EKNATH SHINDE) नातेवाईकाचे नाव आहे, मी याबाबत स्पष्ट सांगितले आहे. काल देखील मला धमकी आली मी ते पोलिसांना सांगितले आहे. मात्र विरोधकांना येणाऱ्या धमक्या हे लोक गांभीर्याने घेत नाहीत. पोलीस यंत्रणा फक्त पोलिसांचा आवाज दडपण्यासाठी, त्यांच्यावर खोट्या कारवाई करण्यासाठी वापरण्यात येत आहे, असे राऊत म्हणाले.
संजय राऊत यांच्या मोबाईलवर पाठवलेल्या मॅसेजमध्ये राऊतांची एके 47 ने हत्या करण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीच्या (MASSAGE) मॅसेजमध्ये संजय राऊत यांना हिंदूविरोधी म्हटले आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्याप्रमाणेच दिल्लीत संजय राऊतांची हत्या करू. लॉरेन्सकडून हा संदेश पाठवण्यात आला आहे, असे धमकीत म्हटले आहे.

 

अरबीचे सालन आणि कोरिएंडर चिकन | Arbi salan Recipe | Coriander Chicken Recipe | Ep No. 105

https://youtu.be/hojONBGqsvI

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा