ग्राहकांना वीजदरांचा ‘शॉक’, आजपासूनच निर्णय लागू

0

मुंबई : (MUMBAI) राज्यातील वीज ग्राहकांना धक्का देणारा निर्णय अखेर जाहीर झालाय. घरगुती वीज दरात ६ टक्क्यांनी वाढ झाली असून (Electricity Rates Hiked for Domestic Consumers) कंपन्यांनी वीज दरवाढीचा निर्णय आजपासून लागू केला आहे. महावितरणसह खासगी क्षेत्रातील बेस्ट, अदानी आणि टाटा पावरने देखील ही दरवाढ केली आहे. कंपनाना वीज पुरवठ्यात आर्थिक तोटा होत असल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचा कंपन्यांचा दावा आहे. महावितरणच्या ग्राहकांना 2023-24 मध्ये सरासरी 2.9 टक्के तर 2024-25 साठी 5.6 टक्के दरवाढ करण्यात आलीय. घरगुती (POWER HIKED) वीजेच्या दरात 2023-24 साठी सहा टक्के तर 2024-25 साठी सहा टक्के वाढ झाली आहे. तर(BEST CONSUMERS) बेस्टच्या ग्राहकांना 2023-24 साठी वीज दरात सुमारे 5.07 टक्के तर 2024-25 साठी 6.35 टक्के अधिक मोजावे लागणार आहेत.(TATA POWER) टाटा पावरच्या ग्राहकांना सरासरी 2023-24 साठी 11.9 टक्के वाढ झाली आहे. तर 2024-25 साठी 12.2 टक्के वाढ झाली आहे. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या ग्राहकांना 2023-24 साठी सरासरी 2.2 टक्के तर 2023-24 साठी २.१ टक्के अधिक मोजावे लागणार आहेत.

महावितरणने(By distribution) यासंदर्भात काढलेल्या प्रसिद्धीपत्रात म्हटले आहे की, आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, महावितरण कंपनीने या याचिकेवर जनतेकडून लेखी सूचना आणि हरकती मागविल्या आणि २१ फेब्रुवारी, २०२३ ते ०३ मार्च, २०२३ दरम्यान पुणे, नवी मुंबई, अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक जाहीर सुनावण्या घेतल्या. जनतेशी सल्लामसलतीच्या या प्रक्रियेनंतर आयोगाने ३१ मार्च, २०२३ रोजीच्या आदेशाद्वारे आर्थिक वर्ष २०२३ – २४ आणि २०२४-२५ साठी महावितरण कंपनीची एकूण महसुली गरज आणि वीज दर निश्चित केला आहे. सुधारित वीज दर दिनांक १ एप्रिल २०२३ पासून अंमलात येतील.

वीज गळती, चोरी कारण?

राज्यात वीज गळती (power outage,)व वीज चोरीवर नियंत्रण नाही. मराठवाड्यातील काही फिडरवर 80 ते 99 टक्क्यांपुढे वीज गळती होत आहे. यामुळे वीज हानी वाढली आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्याऐवजी या नुकसानभरपाईसाठी वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर करून ग्राहकांकडून तो वसूल केला जात आहे, असा आरोप वीज क्षेत्रातील अभ्यासक करीत आहेत. तर देशात महागडी वीज महाराष्ट्रात असल्याचाही आरोप होत आहे. आंध्र प्रदेशमध्ये आधिभारासह कमीत कमी 1.9 आणि जास्तीत जास्त 9.75 रुपये, गुजरात 3.5 ते 5.2, दिल्ली 3 ते 8 रुपये, गोवा 1.6 ते 4.5 रुपये वीज दर आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्रात 5.36 ते 15.56 रुपये प्रतियुनिट दराने वीज मिळते, असा दावाही होतोय.

 

अरबीचे सालन आणि कोरिएंडर चिकन | Arbi salan Recipe | Coriander Chicken Recipe | Ep No. 105

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा