“अनेकांना मी गृहमंत्री म्हणून नकोय”, फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना टोला

0

मुंबई : झेपत नसेल तर गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीय. त्याला उपमुख्यमंत्री फडणवीस (DCM Devendra Fadnavis)यांनी उत्तर दिले. “मला याची कल्पना आहे की मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे. अनेकांना मनातून अस वाटतेय की मी गृहमंत्री नाही राहिलो तर बरं होईल” या शब्दात फडणवीस यांनी खासदार सुळेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. “जे जे लोक चुकीचं काम करतील, त्यांच्यावर १०० टक्के कारवाई होईल. मी आजही सांगतो, मी कुणाला घाबरत नाही, कुणाला दबत नाही. जे कायदेशीर आहे तेच वागतो. कायद्यानेच राज्य चालेल”, असे फडणवीस म्हणाले. “मी त्यांना एवढेच सांगू इच्छितो की मी गृहमंत्री राहणार आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी गृहमंत्रीपदाचा कार्यभार दिला आहे. जे जे चुकीचे काम करतील, त्यांना  शिक्षा  झाल्याशिवाय राहणार नाही. गृहमंत्री म्हणून यापूर्वीही पाच वर्षं हे पद मी सांभाळले आहे. यापुढेही जे लोक अवैध काम करतील, त्यांना मी सोडणार नाही”, असा इशाराही फडणवीस यांनी यावेळी बोलताना.
संभाजीनगरमध्ये निर्माण झालेली दंगलसदृश्य परिस्थिती आणि संजय राऊतांना आलेल्या धमकीबाबत सुप्रिया सुळेंनी (MP Supriya Sule) फडणवीसांवर टीका केली होती.

राऊतांना दारुच्या नशेत धमकी

दरम्यान, खासदार संजय राऊत यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. त्याने दारुच्या नशेत धमक्या दिल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेचा संपूर्ण तपास केला जाणार असून कोणी धमकी दिली तरी कारवाई होईल. राज्यात कोणीही धमकी दिली तरी सरकार अथवा पोलिस शांत बसणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.