फाळणीची चूक आता पाकिस्तानीही मान्य करताहेत-सरसंघचालक डॉ. भागवत

0

भोपाळ : “पाकिस्तानातील लोक स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही आनंदी नाहीत. फाळणी ही एक मोठी चूक होती, असे ते आता मान्य करू लागले आहेत. अखंड भारत हेच सत्य आहे, खंडित भारत एक दु:स्वप्न आहे” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी (RSS Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat ) केले. भोपाळमध्ये आयोजित अमर शहीद हेमू कालाणी जन्मशताब्दी वर्ष समारोपाच्या कार्यक्रमादरम्यान म्हणाले. डॉ. भागवत म्हणाले, “कट्टरतेमुळे ते भारतापासून, संस्कृतीपासून वेगळे झाले. पण ते आता सुखी आहेत का? भारतात सुख आहे आणि तिथे दु:ख आहे. कारण जे योग्य आहे ते टिकतेे आणि चुकीचे आहे ते संपते. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, तयार राहा, कसे होईल, काय होईल हे मला माहिती नाही. भारताने पाकिस्तानवर आक्रमण करावे, असे मला वाटत नाही. कारण आपण आक्रमणकारी नाहीत. तशी आपली संस्कृती नाही” असेही सरसंघचालक म्हणाले. जगभरातील सिंधी बांधव या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी कार्यक्रमासाठी दाखल सिंधी समाज बांधवांना उद्देशून भागवत म्हणाले की, तुम्ही फक्त त्या भारतातून या भारतात आला आहात. पूर्ण हिंदूस्तान आपले आहे. आपण आपल्या जमिनीला विसरता कामा नये. आम्हाला नवा भारत उभारायचा आहे. भारत खंडित झाला आहे. आम्ही मनाने तो सोडून द्यावा याची गरज नाही. आमच्यासोबत त्या जमिनीशी नाते कायम राहील. आम्ही सिंधू संस्कृती विसरू शकत नाही, असेही ते म्हणाले.

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा