ठाकरे कुटुंबाच्या अडचणी पुन्हा वाढ!

0

श्मी ठाकरेंच्या १९ बंगल्यांची तक्रार घेऊऩ भाजपा नेते किरीट सोमय्या पोहोचले पोलिस


मुंबई. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray and his wife Rashmi Thackeray ) यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. भाजपाचे नेते किरिट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) रेवदंडा पोलिस ठाण्यात (Revdanda Police Station ) तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. किरीट सोमय्या यांनी ३१ डिसेंबरलाच एक व्हिडिओ ट्विट केला होता. त्यात किरीट सोमय्या म्हणाले होते की, उद्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षात अनिल परब, हसन मुश्रीफ, अस्लम खान, किशोरी पेडणेकर यांच्या सदनिका आणि ठाकरे परिवाराचे १९ बंगले हे सगळे घोटाळे बाहेर काढणार. त्यानंतर ते आज तातडीने रेवदंडा या ठिकाणी पोहचले. किरीट सोमय्यांनी नवीन वर्षी सकाळी ११.३० ला रेवदंडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणार असाही इशारा दिला होता. त्या आशयाचे एक ट्विटही किरीट सोमय्यांनी केलं होते. त्यानंतर ते रेवदंडा या ठिकाणी पोहचले.
रश्मी ठाकरे यांच्या कोर्लई गावातील १९ बंगल्यांची कागदपत्रे देत आहोत. आम्हाला आतापर्यंत हे बंगले तिथे आहेत, असे सांगण्यात येत होते. लेखी उत्तरेसुद्धा तशीच होती. त्यानंतर आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर बंगले नाहीत.’
असे सांगण्यात आले. सदर जागेवरील बंगलोचे काय झाले याची चौकशी करावी ही विनंती, अशा आशयाची तक्रार सोमय्यांनी पोलिसांना दिली आहे. यावर आमदार प्रशांत ठाकूर, महेश भोसले यांनीही सह्या केल्या होत्या.
फेब्रुवारी २०२२ मध्येही किरीट सोमय्यांनी हे प्रकरण बाहेर काढले होते त्यावेळी त्यांनी कोर्लई या गावाला भेटही दिली होती. कोर्लई या गावातल्या सरपंचांनी २०१९च्या ग्रामसभेत रश्मी ठाकरे यांनी अर्ज केला होता. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की २०१४ मधअये मी जो करार नोंदणी केला ती जमीन आणि इतर सर्व गोष्टी अन्वय नाईक यांच्याकडून घेतल्या. ताडाची, माडाची झाडे, विहिरी हे सगळे माझे आहे. जमीन माझ्या नावावर झाली आहे. मात्र घरंही माझ्या नावार झाली पाहिजेत असं रश्मी ठाकरेंनी अर्जात म्हटल्याचे किरीट सोमय्यांनी म्हटले होते. मे २०१९ च्या ग्रामसभेत सरपंचांनी प्रस्ताव मंजूर केला. त्यात सगळी घरं रश्मी उद्धव ठाकरे आणि मनिषा रविंद्र वायकर यांच्या नावे करावीत असे म्हटले होते. जून २०१९ मध्ये हा प्रस्ताव मंजूर झाला. ही घरे त्यांच्या नावावर करण्यात आली असेही किरीट सोमय्यांनी स्पष्ट केले होते. आता पुन्हा याच बंगल्यांवरून सोमय्या आक्रमक झाले आहेत.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा