लोकसभा निवडणुकीचे ते सर्वेक्षण वस्तुस्थितीला धरून नाही-मुख्यमंत्री

0

मुंबई : लोकसभेच्या निवडणुका झाल्यास देशात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार येण्याची शक्यता असली तरी महाराष्ट्रात भाजप व शिंदे गटाला मोठा फटका बसू शकतो व महाविकास आघाडीला मोठा फायदा मिळू शकतो, या इंडिया टुटे व सी व्होटरच्या सर्वेक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त (CM Eknath Shinde on C voter Survey) केली आहे. हा सर्वे वस्तुस्थितीला धरून नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. ३ ते ४ हजार लोकांना भेटून असे अंदाज लावल्या जात असतील तर ते वस्तुस्थितीला धरून नाही. अलिकडच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये जे यश बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपला मिळाले, ते पाहता सर्वेक्षणाला आधार नाही, असा दावा शिंदे यांनी केलाय. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जो निकाल लागेल, त्याचा सँपल सर्वे सर्वात मोठा असेल, असेही ते म्हणाले. सर्वेक्षणाचे अंदाज राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला चिंतेत टाकणारे आहेत. आताच लोकसभेची निवडणूक झाल्यास राज्यात युपीएला ३४ जागांवर विजय मिळेल, असे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. तर भाजप व शिंदे गटाला मोठा फटका बसून एनडीएला केवळ १४ जागा मिळतील, असा दावाही सर्वेक्षणात करण्यात आलाय. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आता निवडणुका झाल्या तर हा अंदाज लावण्यात आला. मात्र आता निवडणुका दिड वर्षांनी होणार आहेत. महाराष्ट्रात आघाडी होत आहे, असे गृहित धरुन असा अंदाज लावणे हे दिशाभूल करणे आहे. कारण राजकारणात दोन अधिक दोन चार कधीच होत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
महाविकास आघाडीला मागच्या लोकसभेत मिळालेल्या जागाही राखता येणार नाही, असे शिंदे म्हणाले.
आताच निवडणुका झाल्यास एनडीएला 298 आणि यूपीएला 153 जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आलाय. याशिवाय इतरांना 92 जागा मिळण्याची शक्यता सर्वेक्षणातून मांडण्यात आली आहे. मतांची आकडेवारी पाहता एनडीएला 43, यूपीएला 29 आणि इतरांना 28 टक्के मते मिळण्याचे अंदाज आहेत. जानेवारी महिन्यातच हे सर्वेक्षण पार पाडण्यात आले व त्यात 1 लाख 40 हजार 917 लोकांनी भाग घेतला, असा दावा सी व्होटरकडून करण्यात आलाय. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात तत्कालीन भाजप व शिवसेना युतीला ४१ जागा मिळाल्या होत्या. त्यात भाजपला २३ तर सिवसनेला १८ जागा मिळाल्या होत्या. तर युपीएला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले होते. सहा महिन्यापूर्वी झालेल्या सत्तासंघर्षात शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. तर दुसरीकडे भाजपने राज्यात मिशन ४५ ची घोषणा दिली आहे.

 

फेनल अँड पेपर चिकन आणि चिकन टिक्का| EP.NO,78 | Pepper chicken recipe | chicken tikka recipe |