वि.सा. संघाचा ‘मृदगंध’ काव्यगायन उपक्रम
(Nagpur)नागपूर, 3 ऑगस्ट
विदर्भ साहित्य संघातर्फे स्व. मनोहरराव म्हैसाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘‘मृदगंध… काव्य प्रतिभेचा’’ या कार्यक्रमात विदर्भातील प्रतिभावंत कवींच्या कवितांचा सांगीतिक आविष्कार गायकांनी सादर केला. त्याचा रसिकांनी मनमुराद आस्वाद घेतला.
विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात झालेल्या या कार्यक्रमाला निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्यासह विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, (Vice President Ravindra Shobhane)उपाध्यक्ष रवींद्र शोभणे, (General Secretary Vilas Manekar)सरचिटणीस विलास मानेकर, शिरपूरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला (Pradeep Date)प्रदीप दाते यांच्या हस्ते (Dr. Vaishali Upadhyay)डॉ. वैशाली उपाध्ये, (yash Kher)यश खेर, (Parimal Varanshiwar,)परिमल वाराणशिवार, मोरेश्वर दहासहस्त्र, (Avanti Kate)अवंती काटे, (Dr. Parag Ghonge)डॉ . पराग घोंगे, दिलीप मुळे, विनय मोडक व कार्यक्रमाचे निवेदक प्रा. विवेक अलोणी आणि वृषाली देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला.
वैशाली उपाध्ये यांच्या शांतीमंत्राने कार्यक्रमाची सुरुवात केली. आद्य कवी मुकुंदराज यांच्यापासून ते आजपर्यंतच्या वैदर्भीय कवींचा काव्यप्रवास निवेदकांनी संवादात्मक शैलीतून उलगडत नेला. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी लिहिलेले ‘बहु असोत सुंदर संपन्न की महान’ हे सुंदर काव्य यश खरे आणि वैशाली उपाध्ये यांनी सादर केले. कवी बी यांचे ‘चाफा बोलेना चाफा चालेना’ हे मधुर काव्य वैशाली उपाध्ये यांनी सादर केले. प्रज्ञाचश्रू गुलाबराव महाराज, गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, भवानी शंकर पंडित, कवी अण्णासाहेब बोबडे, वसंत आबाजी डहाके, राजा बढे, बालगीतकार शरद मुठे, भाऊसाहेब पाटणकर, गझलकार सुरेश भट, कवी ग्रेस, यांच्या अनेक सुश्राव्य काव्यरचना गायकांनी यावेळी सादर केल्या. या काव्यमैफलीला रसिकांनीही उत्कृष्ट दाद दिली.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदन (Prof. Vivek Aloni)प्रा. विवेक अलोणी आणि (Vrishali Deshpande) वृषाली देशपांडे यांनी केले. मराठी रसिक श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे स्वागत अंजली भांडारकर यांनी केले.