धावत्या बसमध्येच प्रवाशाचा झाला मृत्यू

0

भंडारा(Bhandara), ०८ मे  ”प्रवाशांच्या सेवेसाठी” असे ब्रीदवाक्य एसटी महामंडळाचे आहे, परंतु या ब्रीदवाक्याला हरताळ फासला गेला. गोंदिया-तुमसर- भंडारा या बसमध्ये देव्हाडी येथून एक प्रवासी बसमध्ये चढला. तुमसर शहराच्या वेशीवर त्याला भोवळ आली. तो बेहोष पडल्यावर त्याच्या दोन साथीदारांनी सदर बस रुग्णालयात नेण्याची विनंती बसवाहकाला केली. परंतु त्यांनी न ऐकता वाद घातला व बसस्थानकात बस नेली. त्यानंतर सहकाऱ्यांनी त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत असून, चालक, वाहकांना काळीज आहे की नाही, असा प्रश्नही उपस्थित

केला जात आहे. धावत्या बसमध्ये मृत पावलेल्या तरुणाचे नाव चुनीलाल राऊत (३४) असे असून, तो डोंगरला येथील रहिवासी आहे. असा मुजोर चालक वाहकावर कारवाईची मागणी केली जात आहे.तुमसर भंडारा ही बसगाडी भंडारा आगाराची आहे. चालक व वाहकांना नेमके काय घडले यांच्या अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. याबाबत भंडारा आगाराच्या व्यवस्थापकांना संपूर्ण माहिती दिली असुन योग्य कारवाई केली जाणार असल्याचे तुमसर अगार व्यवस्थापक यांनी सांगीतले आहे.