वनविभागाने घडवून आणली आई आणि शावकांची भेट

0

(Amravti)अमरावती, 16 फेब्रुवारी धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर जवळील मलतपुर शेत शिवारातील एका ऊसाच्या शेतात दोन शावक आढळून आले होते. दरम्यान वनविभागाने त्याच ठिकाणी एका टोपलीत दोन्ही शावकांना गुरुवारला (ता.१५) रात्रीला ठेवले. तसेच या आई असलेली मादी बिबट्या रात्री ३.३० वाजता एक शावक घेवून गेली तर दूसरा शावक ५.३० वाजता अलगदपणे दोन्ही शावकास नेले.आई व पिल्लाच्या भेटीची दृश्य ट्रॅप कॅमेरात कैद झाली आहेत. बिबट्या मादी व शावकांची भेट झाल्याने वन विभागाने सुटकेचा निश्वास सोडला.

तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथील बबलू जयस्वाल यांच्या शेतात उसाची लागवड असून ऊस तोडणीचे काम सुरु असताना मजुरांना सकाळी १० च्या सुमारास दोन लहान शावक दिसून आले होते.दरम्यान चांदुर रेल्वे येथील वनविभागाच्या पथकासह अमरावती येथील रेस्क्यू पथकाने वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल किशोर धोत्रे,सुरेश मनगटे, अमोल गावनेर, वनरक्षक रमेश किरपाने, बचले सह त्यांच्या पथकाने त्या दोन बछडयांना सुरक्षित रित्या रेस्क्यू केले. तसेच पशु वैद्यकीय तपासणी केली होती.दरम्यान वनविभागाने त्याच ठिकाणी एका टोपलीत दोन्ही शावकांना गुरुवारला (ता.१५) रात्रीला ठेवले.या आई असलेल्या मादी बिबट्याने येवून अलगदपणे दोन्ही शावकास नेले.आई व पिल्लाच्या भेटीची दृश्य ट्रॅप कॅमेरात कैद झाली आहेत.