विदर्भवाद्यांची शपथ, 1 मेच्या कोयला रोको आंदोलनाची तयारी पूर्ण
नागपूर. पुढची ईद वेगळ्या विदर्भातच (Vidarbha ) साजरी करू, अशी शपथ विदर्भवाद्यांनी घेतली. विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे (Vidarbha rajya andolan samitee) नागपुरात आयोजित ईद मिलन समारंभात (Eid Milan ceremony ) ही शपथ घेण्यात आली. सोबतच १ मेला महाराष्ट्र दिनी उमरेड कोळसा खाण (Umred Coal Mine) येथे होऊ घातलेल्या कोयला रोको आंदोलन संपूर्ण शक्ती पणाला लावून यशस्वी करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. आंदोलनासाठीची आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन २०२३ अंतर्गत विदर्भ मिळवू औंदा या घोषणेची अंबलबजावणी करण्याच्या दृष्टीने थेट केंद्र सरकारशी संबंधित असलेल्या कोळसा या खनिजाचे उत्पादन करून वीज निर्मितीकरिता देशभर जाणारा कोळसा अडविण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनासह वेगळ्या विदर्भाचे रणशिंग नव्या दमाने फुंकले जाणार आहे.
विदर्भात ६३०० मेगावॅट वीज तयार होते व त्यापैकी विदर्भाला केवळ २२०० मेगावॅट वीजच वापरावयास मिळते. विदर्भात ५८ टक्के शेतीपंपाचा अनुशेष असून ६ ते १२ तास लोडशेडींग सहन करावे लागते. प्रदूषणामुळे श्वासोच्छवासाचे फुफ्फुसाशी संबंधित सर्व आजार विदर्भातील प्रदूषित जिल्ह्यात आहे. दिल्ली व हरियाणा येथील हृदय रोग तज्ञांची चमू ४ वर्षाआधी विदर्भात येऊन गेली असून त्यांनी ५ वर्षात प्रदूषण नियंत्रणात आले नाही तर देशात सर्वाधिक हृदय रोगी चंद्रपूर जिल्ह्यात व विदर्भात मिळतील असे जाहीरपणे सांगितले होते.
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीची लढाई गेल्या ११८ वर्षापासून सुरु असून ती ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कायमची निकाली काढण्याच्या दृष्टीने विदर्भ राज्य आंदोलन समितीने गेल्या ११ वर्षांपासून आंदोलनाची मालिका सुरु ठेवली असून ही आर पार ची लढाई समजून तिचा बिगुल वाजविण्याच्या दृष्टीने व ३१ डिसेंबर २०२३ पूर्वी ‘करू किंवा मरू, जिंकू किंवा मरू’ या तऱ्हेने निकराची लढाई लढून विदर्भ निर्मितीचा प्रश्न कायमचा निकाली काढण्याचा निर्धार विदर्भवाद्यांनी केला आहे. कोयला रोको आंदोलनाला नागपूर शहरातून मोठ्यासंख्येने कार्यकर्ते सहभागी होतील असा निर्धार करण्यात आला.