राउतांचे विधान मुंगेरीलाल के हसीन सपने

0

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे टिकास्त्र

नागपूर. संजय राऊत गेल्या सातत्याने वक्तव्ये करीत आहेत. त्यांचे डोके तपासून घ्यावे लागेल. आतापर्यंत राऊत यांचे वक्तव्य म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत, ते कधीच खरे होत नाहित, असे टीकास्त्र कृषीमंत्री आणी शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी आज येथे डागले. नागपूर विभागातील खरीब हंगामाच्या तयारीचा आढावा त्यांनी आज घेतला. त्यानंतर ते पत्रकारांसोबत बोलत होते. त्यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या टीकेबाबत विचारले असता ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या हातात संपूर्ण महाराष्ट्र होता, त्यांचेच साम्राज्य होते, तेव्हा त्यांना काहीच करता आले नाही. भारतीय जनता पक्ष खंबीरपणे आमच्यासोबत आहे, तोवर आम्हाला कोणताच धोका नसल्याचे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर बरेच काही अवलंबून असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राधाकृष्ण विखे पाटलांशी आमची दोस्ती २५ वर्षांपासून कायम आहे. पण, एकनाथ शिंदेंना बदलून विखे पाटलांना मुख्यमंत्री करा, असे मी म्हणालो नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आजवर झालेल्या कोणत्याही मुख्यमंत्र्यापेक्षा एकनाथ शिंदे चांगले काम करीत आहेत. मुख्यमंत्री कुणालाही होता येईल, पण त्यासाठी 145 चा आकडा आवश्यक आहे. हा कार्यकाळ आम्ही पूर्ण करूच, येणाऱ्या निवडणुका देखील शिंदे यांच्या नेतृत्वातच आम्ही लढणार आहोत. अजित पवार सरकारमध्ये येणार की नाही, हे माहीती नाही. मात्र आले तरी त्यानंतर आमची भूमिका काय राहणार यावर एकनाथ शिंदे निर्णय घेतील. शिंदे आमचे नेते आहेत. ते घेतील तो प्रत्येक निर्णय आम्हाला मान्य असेल. राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना सावध राहा असे म्हटले असेल तरी ते शिंदे हे टायगर आहेत. सामान्यांचे नेते आहेत. त्यामुळे त्यांना घाबरण्याची गरज नाही, असेही सत्तार म्हणाले.