नागपूर: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे आज नागपुरात शुक्रवारी सूप वाजले. दोन वर्षानंतर झालेल्या आणि शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अधिवेशनाची यावेळी विशेष उत्सुकता होती. पुढील अधिवेशन मुंबईत 27 फेब्रुवारी 2023 रोजी होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. 19 ते 30 डिसेंबर अशा दहा दिवसांच्या या अधिवेशनात प्रत्यक्षात 84.10 तास कामकाज झाले 8.31 तास वेळ वाया गेला. रोज सरासरी 8.25 तास कामकाज झाले. तारांकित प्रश्नांची संख्या 6846 होती तर 422 प्रश्न स्वीकृत करण्यात आले. उत्तर केवळ 36 प्रश्नांना मिळू शकले. यावेळी वैशिष्ट्य म्हणजे 2018 लक्षवेधी प्राप्त झाल्या यातील 333 स्वीकृत करण्यात आल्या तर तब्बल 106 लक्षवेधींवर सभागृहात चर्चा होऊ शकली. महत्वाचे लोकायुक्त विधेयकासह 12 विधेयके यावेळी सभागृहात संमत झाली. विधान परिषदेत संमत झालेली तीन विधेयके संमत झाली. सदस्यांच्या उपस्थितीची कमाल सरासरी 91.32 टक्के तर किमान 50.57 होती. दैनंदिन सरासरीचा विचार करता 79.83% सदस्य सभागृहात उपस्थित होते असेही यावेळी अध्यक्षांनी सांगितले