कोण कुणाचा करेक्ट कार्यक्रम करते हे जनता २०२४ मध्ये ठरवेल

0

माझ्या बारामतीच्या एका दौर्यामुळे अजित पवार यांच्यावर एवढा फरक पडला की ते माझा करेक्ट कार्यक्रम करायला निघाले आहे. करेक्ट कार्यक्रम कुणाचा करायचा हे जनता २०२४ मध्ये ठरवेल. २०२४ च्या निवडणुकीत महाविकास आघाडीला उमेदवार देखील भेटणार नाही, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलतांना केला.
बारामती विकास म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा विकास नाही. अजित पवारांच्या वागण्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. त्यांचा करेक्ट कार्यक्रम २०२४ मध्ये जनता करणार आहे. त्यांचे कुठलेही चॅलेंज आम्ही स्विकारायला तयार असल्याचे बावनकुळे म्हणाले.
राष्ट्रवादी सत्तेत आली तेव्हा सत्तेची फळ अजितदादांनी चाखले आहे. तरीही पश्चिम महाराष्ट्राचा विकास केला नाही. सत्तेपासून पैसा आणि पैसापासून सत्ता असे त्यांचे राजकारण राहिले आहे. त्यांनी आपल्या पक्षाचे बघायला हवे. ते ओबीसीचे मारेकरी आरोप बावनकुळे यांनी केला. लोकायुक्त कायदा हा महत्वाचा आहे. ज्यांनी ५० वर्ष सत्तेपासून पैसा कमविला. त्यांना लोकायुक्ताची भिती वाटते आहे. घोटाळ्याचे बॉम्ब आमच्याजवळही आहे. पीएमआरडीएमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी किती जमिनी ग्रीनबेल्टच्या यलोबेल्टमध्ये केल्या एवढे जरी मांडले तरी भरपूर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भ्रष्टाचाराच्या गोष्टी बंद केल्या पाहिजे, असेही बावनकुळे म्हणाले

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा