21 लाखांची चोरी, चोरट्याला ठोकल्या बेड्या

0

 

गोंदिया (Gondia)- गोंदिया शहरातील सिव्हिल लाईन परिसरात 9 मार्च रोजी चोरीची घटना घडली होती. जवळपास 21 लाख रुपये किंमतीचे दागिने चोरी करण्यात आले होते.घटनास्थळाचे तसेच त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील सी.सी.टी.व्ही.फुटेजच्या आधारे आरोपी साहील उर्फ माट्या राजु आंबेकर, राहणार चंद्रपुर याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले. सदर गुन्ह्यातील आरोपी हा गुन्हा करून वर्धा येथे पळून गेला होता.

वर्धा येथे एका हत्याप्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. त्यामुळे गोंदिया शहर पोलीसांनी वर्धा येथील पोलीस स्टेशन येथे जाऊन आरोपी साहील उर्फ माट्या राजु आंबेकर यास ताब्यात घेतले. आरोपीच्या चंद्रपुर येथील घराची झडती घेतली असता त्याच्या घरात 15 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला. साहील उर्फ माट्या हा अट्टल गुन्हेगार आहे. या आरोपीने २५ च्या आसपास गुन्हे केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधिक्षक नित्यानंद झा यांनी दिली.