हत्तीरोग निर्मूलनासाठी आरोग्य विभागाची मोहीम

0

 

गोंदिया (Gondia)- गोंदिया जिल्ह्यात हत्तीरोग निर्मूलनासाठी 26 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीमध्ये हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबवण्यात येणार असून, गोंदिया जिल्ह्यातील 9 लाख 63 हजार 610 लाभार्थ्यांना डीसीई गोळ्यांचे वयोमानानुसार वाटप करण्यात येणार आहेत. या कामासाठी आरोग्य विभागातर्फे 3854 कर्मचारी आणि 385 पर्यवेक्षक हे काम करणार आहेत. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, हे प्रत्येक घरी जाऊन या गोळ्यांचे कर्मचारी आपल्यासमोर जेवण झाल्यावर सेवन करण्यासाठी नागरिकांना सांगणार असल्याने या नागरिकांनी व बालकांनी सहकार्य करण्याचे आणि या गोळ्या सुरक्षित असून, सर्वांनी याचे सेवन करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन वानखेडे यांनी केले आहे.