Home National मानहानी प्रकरणी ‘या नेत्याला’ मिळणार जमीन

मानहानी प्रकरणी ‘या नेत्याला’ मिळणार जमीन

0

बंगळुरूच्या विशेष न्यायालयाने दिली मंजुरी

बंगळुरू(Bangalore) 07 जून:- भाजपने दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात काँग्रेस खासदार राहुल गांधींना(Rahul Gandhi) आज, शुक्रवारी मोठा दिलासा मिळाला आहे. कर्नाटकमधील बंगळुरू इथल्या विशेष न्यायालयाने हा जामीन मंजूर केलाय. यावेळी राहुल गांधी स्वतः कोर्टात हजर होते. याप्रकरणाची पुढील सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे.

खासदार राहुल यांच्यावर कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी वर्तमानपत्रांमध्ये बदनामीकारक जाहिराती दिल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षी राज्यातील निवडणुकीपूर्वी दिलेल्या जाहिरातीत राज्यातील तत्कालीन भाजप सरकारवर 2019-2023 या कालावधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर भाजपने वृत्तपत्रात अपमानास्पद जाहिराती दिल्याचा आरोप करत राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली होती. आता त्याप्रकरणी राहुल यांना जामीन मिळाली आहे. जाहिरातीत काँग्रेसने 2019 ते 2023 या काळात राज्यातील तत्कालीन भाजप सरकारवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी भाजपने न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणातच न्यायालयाने 1 जून रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनाही जामीन मंजूर केला आहे. त्यावेळी न्यायालयाने राहुल गांधींना 7 जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते.

दरम्यान, 23 मार्च 2023 रोजी सुरतच्या सीजेएम कोर्टाने राहुल गांधींना 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. मोदी आडनावाबाबत केलेल्या टिप्पणीमुळे त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर दुसऱ्याच दिवशी, 24 मार्च रोजी लोकसभा सचिवालयाने त्यांचे सदस्यत्व काढून टाकण्याचा आदेश जारी केला. नियमानुसार खासदार किंवा आमदाराला 2 वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास त्याचे सदस्यत्व गमवावे लागते. राहुल यांच्या बाबतीतही असेच घडले. मात्र, नंतर राहुल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली.