Home entertainment ‘चित्रमूल्य : वास्तव आणि संभ्रम’ यावर तीन व्याख्याने

‘चित्रमूल्य : वास्तव आणि संभ्रम’ यावर तीन व्याख्याने

0
'चित्रमूल्य : वास्तव आणि संभ्रम' यावर तीन व्याख्याने

वि. सा. संघ आणि ‘सर्जन निर्माण’चे 28 जून रोजी आयोजन

नागपूर(Nagpur), २६ जून :- नामवंत चित्रकारांची चित्रे आजकाल करोडो रुपयात विकली जातात. चित्रकाराच्या प्रतिभेचे हे मूल्य कसे ठरते आणि ती चित्रे अफाट किमतीत कशी विकली जातात, याचे सर्वसामान्य रसिकाला आणि प्रत्यक्ष कलाक्षेत्राला देखील नेहमी कुतूहल वाटते. याच विषयावर “चित्रमूल्य : वास्तव आणि संभ्रम” या शीर्षकाखाली तीन लघुव्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.
विदर्भ साहित्य संघ आणि सर्जना निर्माण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्र -शिल्प रसग्रहण मालिकेतील हा २७ वा कार्यक्रम शनिवार, २८ जून रोजी सायंकाळी ६.१५ वाजता विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलातील अमेय दालनात होईल.
एम. एफ हुसेन यांच्या ११८ कोटी रुपयांना विकल्या गेलेल्या ‘ग्रामयात्रा’ या चित्रावर चित्रकला महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे भाष्य करतील तर तैय्यब मेहता यांच्या अंदाजे ६२ कोटी रुपयांना विकल्या गेलेल्या ‘ट्रस्ड बुल’ या चित्रावर चित्रकार आणि चित्रसंग्राहक मिलिंद लिंबेकर बोलतील. अमृता शेरगिल यांच्या अंदाजे ६२ कोटी रुपयांना विकल्या गेलेल्या ‘स्टोरी टेलर’ या चित्राविषयी प्रा. चंद्रकांत चन्ने मनोगत व्यक्त करतील. या कार्यक्रमास साहित्य-चित्र रसिकांनी या कार्यक्रमास अवश्य यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Three lectures on image value reality and illusion pdf
Difference between imagery and allusion