तिरळे कुणबी समाज संघटन नागपूर जिल्हा अध्यक्षपदी नरेंद्र बाडे

0

 

(Nagpur)नागपूर – (Tirle Kunbi Samaj Sanghatan Nagpur)तिरळे कुणबी समाज संघटन नागपूर जिल्हा अध्यक्षपदी (Narendra Bade)नरेंद्र बाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच चिखलदरा येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. तिरळे कुणबी समाज संघटन महाराष्ट्र राज्य या नोंदणीकृत संघटनेची चिखलदरा येथे बैठक पार पडली. या सभेत राज्यभरातील तिरळे कुणबी समाजाचे पदाधिकारी समाज बांधव व महिलांची प्रामुख्याने उपस्थिती होती. संघटनेचा उद्देश व कार्यप्रणाली या संदर्भात यावेळी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. सर्व पदाधिकाऱ्यांना यावेळी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी (Vice President Girish Kale)उपाध्यक्ष गिरीश काळे,कोषाध्यक्ष (Vikram Mankar)विक्रम मानकर, (Secretary Parag Wankhede)सचिव पराग वानखेडे यांनी नागपूर जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे नरेंद्र बाडे यांना प्रदान केली. यावेळी राज्य जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.