
नागपूर(Nagpur) ९ जुलै :- महापारेषण बेसा सबस्टेशन (१३२ केव्ही) येथे अधिकाऱ्यांनी आपले श्रमदान करून १०० रोपांची लागवड केली.श्रमदानातून वृक्षारोपण व संवर्धन प्रतिज्ञा कार्यक्रम घेण्यात आला. महापारेषणचे मुख्य अभियंता सतीश अणे आणि महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते बेसा उपकेंद्राच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वीज विभागाचे अधिकारी, कर्मचारी, माजी नगरसेवक स्वाती आखटकर यांच्यासह सुमारे शेकडो नागरिक उपस्थित होते.
उपस्थितांचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन कार्यकारी अभियंता
अमलेश लोटे आणि बेसा उपकेंद्र प्रमुख विनय मोटघरे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सागर सोनुले, प्रीती घाटे, सोनाली इंगळे, जय श्री उमरे, सुखदा सोनटक्के, अमोल येनगंटीवार, आशिष सेलोकर, विलास लेंडे, निशा पाचघरे, अखिल मुधोळकर, शुभांगिनी उत्खड़े, मीनाक्षी खोंडेकर, राजेश लांजेवार, नरेश गंगापूर, पारेश्वर पराक्रमे, पराक्रम देसाई. पूरकर, दीपक निंबाळकर, विवेक मुळे यांनी प्रयत्न केले.
संपादक महोदय कृपया सदर बातमी आपल्या प्रसिद्ध वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात यावी,
Related posts:
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
नगर राजभाषा कार्यान्वयन समिति (नराकास-2), नागपुर की छमाही बैठक एवं पुरस्कार वितरण समारोह संपन्न
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog

















