या मागणीसाठी दोन युवकांचे टॉवरवर चढून आंदोलन

0

 

(Buldhana)बुलढाणा – धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोरकर व जिल्हा उपाध्यक्ष नवनीत सोनाळकर या दोन युवकांनी आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील लाखनवाडा टॉवरवर चढून अर्ध नग्न व अन्नत्याग सुरू केले आहे. धनगर समाजातील मुले शिक्षण घेऊनही आरक्षण मिळत नसल्याने शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहत आहेत. शिक्षणाला सुध्दा भरपूर खर्च लागत आहे, भारतीय घटनेमध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळावे अशी अधिक्षक कार्यालय नोंद आहे. मात्र, सरकारकडून धनगर समाजावर नेहमीच अन्याय करण्यात आला आहे. राज्य सरकार इतर समाजाबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करत आहे.

मात्र, धनगर समाजाला वेळोवेळी लिपीक आश्वासने देऊन धनगर समाजाची दिशाभूल करत आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गजानन बोरकर यांनी ९ दिवस मेहकर येथे आमरण उपोषण केले होते. मेहकर तालुक्यातील सोनाटी येथील टॉवरवर जाऊन सुध्दा आंदोलन केले होते. त्यावेळी सुध्दा सरकारच्या वतीने अधिकाऱ्यांनी केवळ आश्वासन दिले. मात्र, त्या आश्वासनाची पुर्तता अद्यापपर्यंत झाल्याचे दिसून येत नाही. सरकारच्या या वेळकाढू धोरणामुळे धनगर समाजाचे व धनगर समाजातील गोरगरीब सुशिक्षीत व शिक्षण घेतलेल्या मुला मुलींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने आरक्षण संदर्भात ठोस निर्णय घ्यावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.