मी काँग्रेस सोडून जाणार नाही – विजय वडेट्टीवार

0

 

(nagpur )नागपूर – एक व्यक्ती गेली म्हणजे पूर्ण पक्ष डिस्टर्ब झाला असं समजण्याच कारण नाही. या परिस्थितीतून काँग्रेस नव्याने उभारी घेईल आणि पक्ष मजबुतीने उभा राहील. माझ्या संदर्भात काही वावड्या पसरवण्याचे काम सुरू आहे. मात्र
मी काँग्रेस सोडून जाणार नाही अशी भूमिका विधानसभा (Leader of Opposition Vijay Wadettiwar)विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली.
मला काँग्रेस पक्षाने खूप काही दिले आहे. आता मला फार काही अपेक्षा नाहीत. शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहून या विचारधारेबरोबर काम करण्याचा निर्धार मी केलेला आहे.राज्यसभा निवडणूक संदर्भात महाराष्ट्राचे प्रभारी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्या संदर्भातील चर्चा पुढे येईल.माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी माझे कौटुंबिक संबंध आहेत.
मुंबईची इंडिया आघाडीची बैठक असेल, नागपूरला असलेली काँग्रेसची सभा असो, आम्ही खांद्यावर जबाबदारी घेऊन काम केलेल आहे.

मात्र, (Ashok Chavan)अशोक चव्हाण यांच्या मागे केंद्रीय एजन्सीचा ससेमिरा लावण्याचे काम सुरू झालं होतं. हे सत्य नाकारून चालत नाही. भाजप 400 के पार चा नारा देत असताना दुसऱ्यांचे नेते का पळवत आहे? यांना यांच्यावरच विश्वास राहिला नाही. अशी परिस्थिती सध्या देशात आहे.
प्रभू रामचंद्राच्या नावाने राजकारण झालं. पण त्यातून काही साध्य झालं नाही. मात्र, दुसऱ्यांचे नेते पळवून घर सजवण्याच काम ते करत आहेत.
परंतु, ते लोकांना मान्य होणार नाही.

असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला.काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चेनिथल्ला यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रदेश काँग्रेसची बैठक होत आहे. त्यांनी सर्व वरिष्ठ नेत्यांना बोलावले आहे.अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यासह विविध विषयावर चर्चा होणार असल्याचे स्पष्ट केले.
यासोबतच लोणावळा येथे 16 आणि 17 तारखेला पक्षाची बैठक आहे.
राजकारणात पक्षात बदल होत असतात, लोक जात असतात असेही ते म्हणाले.